रोज सकाळी पायी चालण्याचा का दिला जातो सल्ला? तुम्हालाही माहीत नसतील ही कारणं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 12:32 IST2024-08-10T12:32:18+5:302024-08-10T12:32:46+5:30
Walking Benefits : जास्तीत जास्त लोकांना हेच माहीत आहे की, वजन कमी करण्यासाठी चालावं लागतं. पण चालण्याचे यापेक्षा अधिक फायदे आरोग्याला मिळतात. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

रोज सकाळी पायी चालण्याचा का दिला जातो सल्ला? तुम्हालाही माहीत नसतील ही कारणं...
Walking Benefits : सकाळी झोपेतून उठल्यावर ताज्या हवेमध्ये चालायला जाणं हे शारीरिक आरोग्यासाठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानलं जातं. जास्तीत जास्त डॉक्टर सकाळी काही वेळ चालण्याचा सल्ला देतात. आता जास्तीत जास्त लोकांना हेच माहीत आहे की, वजन कमी करण्यासाठी चालावं लागतं. पण चालण्याचे यापेक्षा अधिक फायदे आरोग्याला मिळतात. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मेटाबॉलिज्म बूस्ट होतं
सकाळी चालण्याने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. ज्यामुळे कॅलरी बर्न होण्यााची प्रक्रिया वेगाने होते. याने वजन कमी करण्यास जास्त मदत मिळते.
शरीराला ऊर्जा मिळते
सकाळी चालल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि ज्यामुळे तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटतं. तसेच तुमची काम करण्याची क्षमताही वाढते.
हार्मोन संतुलन
सकाळी फिरायला गेल्याने शरीरातील हार्मोन संतुलित राहतात. ज्यामुळे तुमचा तणाव आणि चिंता दूर होण्यास मदत मिळते.
चांगली झोप
चालल्याने शरीराचा व्यायाम होतो. याने शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया योग्य पद्धतीने होतात. तसेच शरीरातील वेगवेगळे अवयव व्यवस्थित काम करतात. अशात रात्री तुम्हाला चांगली झोप लागण्यास मदत होते.
हृदय राहतं निरोगी
सकाळी काही वेळ चालल्याने हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. काही वेळ पायी चालल्याने शरीरात रक्तप्रवाह व्यवस्थित होतो. ज्यामुळे शरीरात सगळीकडे ऑक्सिजन पोहोचतं. याने हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
सकाळी चालल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ज्यामुळे शरीराचा वेगवेगळ्या इन्फेक्शन आणि आजारांपासून बचाव होतो.
चालण्याने वजन कमी होतं म्हणून जास्तीत जास्त लोक सकाळी किंवा सायंकाळी चालतात. चालण्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यातील एक महत्वाचा फायदा म्हणजे वजन कमी करणं. सोबतच वेगवेगळ्या आजारांपासूनही सुटका मिळते.
रोज किती चालावं?
तुम्ही किती पावलं चाललात हे तुम्ही एखाद्या अॅपच्या मदतीने ट्रॅक करू शकता. सुरूवातीला १५ हजार पावलं चालणं थोडं कठिण आहे. पण एकदा सवय झाली तर सोपं होतं. चालल्याने मांसपेशींमध्ये होणारी वेदनाही दूर होते. १५ हजार पावलं चालणं हा वजन कमी करण्यासाठी सर्वात चांगला उपाय आहे. ४५ मिनिटांच्या एक्सरसाइजमध्ये तुम्ही ४०० ते ५०० कॅलरी बर्न करू शकता.