सकाळी झोपेतून उठताच फोन चेक करणं किती घातक?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 10:04 AM2019-11-20T10:04:54+5:302019-11-20T10:11:49+5:30
मोबाइल फोनचा वापर आताच्या लाइफस्टाईलमधे किती केला जातो, हे काही वेगळं सांगायला नको. अनेकजण सकाळी झोपेतून उठल्या उठल्या मोबाइल फोन चेक करतात.
(Image Credit : blogs.opera.com)
मोबाइल फोनचा वापर आताच्या लाइफस्टाईलमधे किती केला जातो, हे काही वेगळं सांगायला नको. अनेकजण सकाळी झोपेतून उठल्या उठल्या मोबाइल फोन चेक करतात. पण खरंच सकाळी झोपेतून उठल्या बरोबर मोबाइल चेक करणं किती योग्य आहे? असा प्रश्न तुम्हाला पडायला हवा. कारण मोबाइल फोनची ही सवय एक मोठी चिंता ठरत आहे. एका रिसर्चनुसार, सकाळी उठल्यावर पहिल्या १५ मिनिटात ५ लोकांपैकी ४ लोक मोबाइल फोन चेक करतात. जर तुम्हीही असं करत असाल तर याच्या नुकसानाबाबत तुम्हाला माहीत असायला हवं.
मेंदू आणि मनाच्या शांतीवर प्रभाव
(Image Credit : mentalfloss.com)
जे लोक सकाळी उठल्यावर लगेच मोबाइल चेक करत असतील तर याचा त्यांच्या मेंदूवर थेट परिणाम होतो. याने मनाची शांतता सुद्धा बाधित होते. व्यक्ती मोबाइल फोन स्क्रोलसोबत मेंदूवरही जोर देतो यानेही असं होत असल्याचं एक्सपर्ट सांगतात. कालच्या आणि आजच्या शेड्युलवर मेंदू वेगवेगळे व्यवहार करतो. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्टचा देखील मेंदू आणि मनावर प्रभाव पडतो. सकाळी उठताच मोबाइल चेक केल्याने तणाव आणि चिंता वाढते. असं ई-मेल, रिमाइंडर आणि इन्स्टाग्राम पोस्टसहीत इतरही सोशल साइट्सवरील मित्रांच्या पोस्टमुळेही होऊ शकतं.
स्वभावात बदल
जर तुम्ही सकाळी उठताच मोबाइल फोन चेक करत असाल तर तुमच्या स्वभावातही बदल येऊ शकतो. काही लोकांमध्ये चिडचिडपणाचं हे कारण असतं. काही लोकांना FOMO नावाची समस्याही होऊ लागते. याचं मुख्य लक्षण आपण कुठेतरी, काहीतरी हरवत चालल्याची भिती हे असतं. ही एक भावनात्मक गोष्ट आहे. पुन्हा पुन्हा राग किंवा संताप येणे यांसारख्या समस्याही होतात.
खाण्याच्या सवयीत बदल
अनेकदा असं पाहिलं जातं की, सकाळी उठल्यावर लगेच जे लोक फोन चेक करतात, त्यांच्या खाण्याच्या व्यवहारातही बदल होऊ लागतो. फोन चेक केल्याने या लोकांचा व्यवहार इतर लोकांच्या तुलनेत वेगळा असतो. सकाळी उठल्यावर हे लोक फिरायला जातात तेव्हा त्यांना अधिक थकवा जाणवतो.
फोकस न करता येणे
जे लोक सकाळी उठून मोबाइल चेक करतात, त्यांचं लक्ष केंद्रीत राहत नाही. जास्तवेळ लोक फोनमधे गुंतलेले असतात आणि आपल्या कामावर लक्ष देत नाहीत. त्यांचं कामात लक्षही लागत नाही. यामुळेच त्यांची कार्यक्षमताही कमी होऊ लागते.
कशी बदलाल ही सवय?
सकाळी उठल्यानंतर फोन चेक करण्याऐवजी इतर गरजेची कामं करावीत. जसे तुम्ही कोमट पाणी सेवन करून फ्रेश होण्यासाठी तयारी करू शकतात.
जर तुम्ही व्यायाम करत नसाल तर सकाळी उठून मेडिटेशन आणि योगाभ्यास करा.
परिवारातील सदस्यांसोबत चहा घ्या, त्यांच्यासोबत गप्पा करा.
रात्री झोपताना फोन सायलेन्ट करा किंवा इंटरनेट बंद करा.
रोज सकाळी तुमची सगळी तयारी केल्यानंतर फोन हाती घ्यावा.