जास्त लोणचं खाणं पुरूषांसाठी घातक, जाणून घ्या काय होतात समस्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 12:17 PM2024-07-16T12:17:13+5:302024-07-16T12:18:36+5:30
Pickle Side Effects : लोणचं तुमच्या जिभेचे चोचले पुरवत असलं तर लोणचं खाल्ल्याने अनेक समस्याही होतात. खासकरून पुरूषांना लोणचं खाऊन अनेक समस्या होतात. त्याच आज आपण जाणून घेणार आहोत.
Pickle Side Effects : जेवणासोबत टेस्टसाठी भरपूर लोक वेगवेगळ्या पद्धतीचं लोणचं खातात. लोणचं दिसलं किंवा नावही काढलं तर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. लोणचं तुमच्या जिभेचे चोचले पुरवत असलं तर लोणचं खाल्ल्याने अनेक समस्याही होतात. खासकरून पुरूषांना लोणचं खाऊन अनेक समस्या होतात. त्याच आज आपण जाणून घेणार आहोत.
काही लोक लोणच्याचं इतकं जास्त सेवन करतात की, ते भाजी ऐवजी लोणच्या सोबतच चपाती खातात. बरेच लोक लोणच्याचं प्रमाणापेक्षा जास्त सेवन करतात. अशा लोकांनी सावध होण्याची गरज आहे.
जास्त लोणच्याने काय होतात समस्या?
गॅस्ट्रिक कॅन्सरचा धोका
काही रिसर्चमधून समोर आलंय की, जास्त प्रमाणात लोणचं खाणाऱ्या लोकांना गॅस्ट्रिक कॅन्सरचा धोका वाढू शकतो. सोबतच यात मिठाचं प्रमाण जास्त असल्याने ब्लड प्रेशरच्या रूग्णांसाठीही हे फार धोकादायक ठरू शकतं. हायपरटेंशनच्या रूग्णांसाठी लोणच्याचं जास्त सेवन करणं फार जास्त नुकसानकारक ठरू शकतं.
प्रिझरव्हेटिव्ह जास्त असतात
बाजारात जे लोणचं मिळतं त्या लोणच्यांमध्ये जास्त प्रिझरव्हेटिव्ह असतात आणि सोबतच या लोणच्यामध्ये जास्त असटामिप्रिड असतात, जे आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक असतात. असटामिप्रिक एक कार्बन आहे, जे तुमच्या सेक्शुअल लाइफमध्ये अनेक समस्या निर्माण करू शकतं. त्यामुळे या लोणच्याचं सेवन कमी प्रमाणात करावं.
कोलेस्ट्रॉल वाढतं
लोणच्याचं कमी प्रमाणात सेवन करावं. कारण जेव्हा लोणचं तयार केलं जातं तेव्हा त्यात भरपूर प्रमाणात तेल टाकलं जातं आणि सोबतच मसाल्यांचा वापर केला जातो. जे आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक असतात. लोणच्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त असल्याने आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि इतर शारीरिक समस्या वाढू शकतात.
लोणच्याने होणाऱ्या इतर समस्या
ब्लड प्रेशर वाढतं
एक्सपर्ट सांगतात की, हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांनी अजिबात लोणच्याचं सेवन करू नये कारण यात मिठाचं प्रमाण जास्त असतं. मिठाचं सेवन जास्त केल्याने हाय ब्लड प्रेशर वाढतं. ज्यानंतर तुम्हाला हृदय रोग आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.
वजन वाढण्याचा धोका
लोणच्यामध्ये जास्त प्रमाणात कॅलरी आणि फॅट असतात. त्यामुळे जास्त लोणचं खाल्ल्याने वजन वाढू शकतं. लठ्ठपणा वाढतो आणि मग हृदयरोगाचा धोका वाढतो.
किडनीवर पडतो वाईट प्रभाव
जास्त मीठ आणि मसाल्याचं सेवन केल्याने किडनीवर जास्त दबाव पडतो. ज्यामुळे किडन्यांचं काम हळू होतं. तुम्ही नेहमीच लोणचं जास्त खात असाल तर किडनीसंबंधी समस्या होऊ शकतात.