'या' कारणाने महिलांच्या तुलनेत कमी रडतात पुरूष, रिसर्चमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 09:31 AM2023-08-08T09:31:40+5:302023-08-08T09:32:26+5:30

Men Cry : पुरूषांच्या रडण्याबाबत आतापर्यंत करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, अभ्यासकांची मतं यावर वेगवेगळी आहेत. काही अभ्यासक म्हणतात की, ही बाब अजूनही एक रहस्य बनून आहे.

Why men shed less tears than women know the reason | 'या' कारणाने महिलांच्या तुलनेत कमी रडतात पुरूष, रिसर्चमधून खुलासा

'या' कारणाने महिलांच्या तुलनेत कमी रडतात पुरूष, रिसर्चमधून खुलासा

googlenewsNext

Men Cry : सामान्य पणे असं पाहिलं जातं की, पुरूषांच्या तुलनेत महिला अधिक रडतात. पण असं नाही की, पुरूष रडत नाहीत. इतकंच नाही तर पुरूषांच्या तुलनेत महिलांबाबत अंसंही म्हटलं जातं की, महिला भावूक असतात. अशात पुरूषांच्या रडण्याबाबत एक रिसर्च समोर आला आहे.

पुरूषांच्या रडण्याबाबत आतापर्यंत करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, अभ्यासकांची मतं यावर वेगवेगळी आहेत. काही अभ्यासक म्हणतात की, ही बाब अजूनही एक रहस्य बनून आहे. सामान्यपणे असं म्हटलं जातं की, जेव्हा भावनात्मक रूपाने कोणत्याही वेळी कुणीही कमजोर होतात तेव्हा त्याची स्वाभाविक प्रतिक्रिया रडणं ही असते. 

महिला आणि पुरूषांच्या रडण्याच्या ट्रेंडवर रिसर्चमधून समोर आलं की, महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये रडण्याचा दर कमी आहे. जर पुरूष रडले तरी ते कमी वेळासाठी रडतात. महिलांमध्ये रडण्यासाठी प्रोलेक्टीन हार्मोन जबाबदार मानला जातो. ते टेस्टोस्टेरॉनच्या वाढत्या स्तराला पुरूषांच्या कमी रडण्याला कारण मानलं आहे. 

जास्त टेस्टोस्टेरॉन, कमी रडणं

रिसर्चनुसार, पुरूषांना जेव्हा प्रोस्टेट कॅन्सरच्या उपचारासाठी अॅंटी टेस्टोस्टेरॉनची औषधं दिली जातात तेव्हा त्याचा प्रभाव त्यांच्या रडण्याच्या प्रवृत्तीवर स्पष्ट दिसतो. पण जेव्हा ट्रांसजेडर महिलांना तेच औषध दिलं जातं तेव्हा त्यांची रडण्याची प्रवृत्ती वाढलेली आढळून आली. म्हणजे याचा अर्थ रडणं आणि टेस्टोस्टेरॉनमध्ये काहीतरी संबंध आहे.

पुरूष कमी रडण्याचं कारण

जेव्हा पुरूष रडतात तेव्हा त्यांना लाज येते, त्यामुळे ते रडणं टाळतात. पण हे रडणं किंवा न रडणं याचा ठोस पुरावा मानता येत नाही. अभ्यासकांनुसार, या विषयावर आणखी अभ्यास करण्याची गरज आहे.

अभ्यासक सांगतात की, पुरूषांच्या रडण्यावर किंवा न रडण्याला केवळ आणि केवळ टेस्टोस्टेरॉनला जबाबदार धरता येणार नाही. हार्मोनचे अतिरिक्तही कारणे असतात. या कारणांना अजून समजून घेण्याची गरज आहे. जेणेकरून पुरूषांची भावना आणि त्यांचा व्यवहार आणखी खोलवर समजून घेता येईल.

Web Title: Why men shed less tears than women know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.