पुरुषांचा ‘सिक्स्थ सेन्स’ महिलांपेक्षा स्ट्राँग का?, चिंता आणि नैराश्याचा होतोय महिलांवर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 06:37 AM2024-04-02T06:37:39+5:302024-04-02T06:38:12+5:30

Health News: दृष्टी, स्पर्श, चव, गंध आणि श्रवण यानंतर माणसातील ‘सिक्स्थ सेन्स’बाबत वेळोवेळी संशोधन झाले आहे. शरीराच्या अंतर्गत अवस्थेबद्दलच्या आपल्या आकलनाला ‘इंटरसेप्शन’ म्हणजेच ‘सिक्स्थ सेन्स’ असेही म्हटले जाते.

Why Men's 'Sixth Sense' Is Stronger Than Women's? Anxiety and Depression Affect Women | पुरुषांचा ‘सिक्स्थ सेन्स’ महिलांपेक्षा स्ट्राँग का?, चिंता आणि नैराश्याचा होतोय महिलांवर परिणाम

पुरुषांचा ‘सिक्स्थ सेन्स’ महिलांपेक्षा स्ट्राँग का?, चिंता आणि नैराश्याचा होतोय महिलांवर परिणाम

लंडन - दृष्टी, स्पर्श, चव, गंध आणि श्रवण यानंतर माणसातील ‘सिक्स्थ सेन्स’बाबत वेळोवेळी संशोधन झाले आहे. शरीराच्या अंतर्गत अवस्थेबद्दलच्या आपल्या आकलनाला ‘इंटरसेप्शन’ म्हणजेच ‘सिक्स्थ सेन्स’ असेही म्हटले जाते. महिलांचा ‘सिक्स्थ सेन्स’ पुरुषांच्या तुलनेत खूपच वेगळा असून, तो महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये किचिंत मजबूत असल्याचे ब्रिटनच्या लंडन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात आढळून आले.

‘द कॉन्व्हर्सेशन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार ‘सिक्स्थ सेन्स’ शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. या विषयावर मागे ९३ अभ्यास करण्यात आले होते. त्या अभ्यासांमधील डेटाचे विश्लेषण करणाऱ्या संशोधनात असे आढळून आले की महिलांना त्यांच्या हृदयाचे ठोके आणि फुप्फुसाचे सिग्नल पुरुषांपेक्षा कमी जाणवतात. 

या फरकामागे रक्तदाब किंवा वजन असे कोणतेही घटक नाहीत. याची मुख्य कारणे आनुवंशिकता, हार्मोन्स, व्यक्तिमत्त्व आणि तणाव असू शकतात. ‘सिक्स्थ सेन्स’वर परिणाम करणारे घटक योग्यरीत्या ओळखणे मानसिक आरोग्य विकारांवर प्रभावी उपचारांसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते, असे संशोधकांनी म्हटले आहे.

विचारही वेगळा
स्त्री-पुरुषांचा विचार करण्याचा आणि समजण्याचा स्तर वेगवेगळा असतो. हेदेखील त्यांच्या ‘सिक्स्थ सेन्स’मधील फरकाचे कारण असू शकते. ‘सिक्स्थ सेन्स’मुळे प्रत्येक व्यक्तीला भविष्यात घडणाऱ्या चांगल्या-वाईट घटनांचा अनुभव येतो. ‘सिक्स्थ सेन्स’बद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

चिंता, नैराश्याचे प्रमाण जास्त असल्याने...
nलंडन विद्यापीठातील मानसशास्त्राच्या व्याख्याता जेनिफर मर्फी म्हणाल्या की, महिलांच्या मानसिक आरोग्यावर त्यांच्या भावना, सामाजिक परिस्थितीचा सर्वाधिक परिणाम होतो. 
nपुरुषांच्या तुलनेत त्यांच्यामध्ये चिंता आणि नैराश्याचे प्रमाण जास्त असल्याने त्यांच्या ‘सिक्स्थ सेन्स’ क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. हा फरक समजून घेण्यासाठी पुढील अभ्यास आवश्यक आहे.

Web Title: Why Men's 'Sixth Sense' Is Stronger Than Women's? Anxiety and Depression Affect Women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.