जास्तीत जास्त लोक ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये आजारी का पडतात? केवळ थंडी नाही कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 10:00 AM2023-10-30T10:00:13+5:302023-10-30T10:00:55+5:30
Winter Health Tips : या महिन्यांमध्ये आजारपण येण्याची वेगवेगळी कारणे आहेत. यासाठी केवळ तापमान कमी होणं हेच कारण नाही.
Winter Health Tips : ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना आला की, जास्तीत जास्त लोक आजारी पडल्याचं बघायला मिळतं. वातावरणात बदल होत असल्याने आजार वाढतात असं नेहमीच सांगितलं जातं. पण या महिन्यांमध्ये आजारपण येण्याची वेगवेगळी कारणे आहेत. यासाठी केवळ तापमान कमी होणं हेच कारण नाही.
काय आहे कारण?
1) व्हिटॅमिन डी ची कमतरता
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात दिवस लहान असतो ज्यामुळे आपण उन्हाच्या संपर्कात कमी येतो. या कारणाने शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता होते. हे व्हिटॅमिन इम्यूनिटी बूस्ट करण्यासाठी महत्वाचं आहे. हेच कारण आहे की, यादरम्यान आपल्याला जास्त वायरल इन्फेक्शनचा सामना करावा लागतो.
2) जास्त वेळ घरात राहतात लोक
या दोन महिन्यात लोक घरात जास्त आणि बाहेर कमी वेळ घालवतात. कारण थंडी हवा अधिक असते. बरेच लोक या हवेच्या संपर्कात येतात त्यामुळे वायरस पसरण्यासाठी एक खास वातावरण तयार होतं.
3) डासांची वाढ
पावसानंतर वातावरणात बदल होऊ लागतो आणि जागोजागी पाणी जमा होऊ लागतं. ज्यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियाच्या डासांसाठी एक चांगलं ब्रीडिंग ग्राउंड तयार होतं. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये या डासांची संख्या खूप वाढते. ज्यामुळे हे गंभीर आजार पसरतात. या दिवसांमध्ये डेंग्यूचा खूप धोका असतो.
4) निष्काळजीपणा
या दिवसात वातावरण कधी जास्त थंड तर कधी जास्त उष्ण असतं. अशात लोक वाढत्या आणि कमी होत्या तापमानात अनेकदा निष्काळजीपणा करतात. जसे की, थंडीमध्ये गरम कपडे न घालणं, तापमान कमी असताना आंघोळ करणं. जास्त तेलकट खाणं, जास्त चहा पिणं अशा चुका महागात पडू शकतात.