जेवण केल्यावर आंघोळ न करण्याचा का दिला जातो सल्ला? वाचाल तर रहाल फायद्यात...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 09:39 AM2024-10-23T09:39:09+5:302024-10-23T09:44:24+5:30

After and Before Meal Habit : जास्तीत जास्त लोक जेवणाआधी आणि नंतर काहीना काही चुका करतात. ज्यामुळे आरोग्याचं नुकसान होतं. पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात.

Why not to do bath immediately after eating meal, know reason | जेवण केल्यावर आंघोळ न करण्याचा का दिला जातो सल्ला? वाचाल तर रहाल फायद्यात...

जेवण केल्यावर आंघोळ न करण्याचा का दिला जातो सल्ला? वाचाल तर रहाल फायद्यात...

After and Before Meal Habit : रोज दोन ते तीन वेळ जेवण करणं ही आपल्या शरीराची गरज असते. कारण आहाराशिवाय आरोग्य चांगलं राहू शकत नाही. जेवणाचे काही नियम असतात. पण सगळेच लोक ते फॉलो करतात असं नाही. जास्तीत जास्त लोक जेवणाआधी आणि नंतर काहीना काही चुका करतात. ज्यामुळे आरोग्याचं नुकसान होतं. पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला जेवणाआधी आणि नंतर कोणत्या चुका करू नये याबाबत सांगणार आहोत, जेणेकरून तुमचं आरोग्य बिघडू नये. 

जेवणानंतर आंघोळ करू नये

जर जेवण केल्यानंतर आंघोळ केली तर याबाबत म्हटलं जातं की, जेवण केल्यावर २ तासांपर्यंत आंघोळ करू नये. अन्न पचवण्यासाठी शरीराचं फायर एलिमेंट जबाबदार असतं, जसेही तुम्ही जेवण करता तेव्हा फायर एलिमेंट अ‍ॅक्टिव होतं. ज्याने ब्लड सर्कुलेशन वाढतं. हे पचनक्रियेसाठी चांगलं असतं. पण जर तुम्ही जेवण केल्यावर आंघोळ केली तर शरीराचं तापमान कमी होतं, ज्यामुळे पचनक्रिया हळुवार होते.

जेवणानंतर किती वेळाने करावी आंघोळ?

एक्सपर्टने दिलेल्या माहितीनुसार, जेवण केल्यावर आंघोळ करणं नुकसानकारक ठरतं. याने अ‍ॅसिडिटी, उलटी अशा समस्या होतात. इतकंच नाही तर तुमचा लठ्ठपणाही वाढू शकतो. नियमानुसार, व्यक्तीने जेवणाआधी आंघोळ केली पाहिजे. कारण जेव्हा आपण आंघोळ करतो, तेव्हा प्रत्येक पेशी री-एनर्जाइज्ड होतात आणि आपल्याला फ्रेश वाटतं. याने आपल्या शरीराला भूक लागल्याचे सिग्नल मिळतात. एक्सपर्ट सांगतात की, जेवण केल्यावर साधारण १ तासानंतर आंघोळ करावी.

जेवणानंतर लगेच झोपू नये

जेवण केल्यावर लगेच झोपणंही आरोग्यासाठी नुकसानकारक असतं. यामुळे अन्न व्यवस्थित पचन होत नाही. असं केलं तर शरीरात फॅट जमा होऊ लागतं आणि लठ्ठपणाचा धोका अधिक वाढतो. अन्न चांगलं पचन व्हावं यासाठी गरजेचं आहे की, जेवण केल्यावर काही वेळ पायी चालावं. 

जास्त पाणी पिऊ नये

जेवणानंतर पाणी पिणं फार गरजेचं असतं. कारण याने अन्न पचन होण्यास मदत मिळते. पण जेवणानंतर लगेच पाणी पिण्याची सवय चुकीची आहे. जेवणानंतर लगेच भरपूर पाणी प्याल तर अन्न पचन होत नाही. अशात पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. त्यामुळे जेवणानंतर साधारण अर्ध्या तासाने पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

Web Title: Why not to do bath immediately after eating meal, know reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.