काही लोकांना का असते झोपेत चालण्याची सवय?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 03:51 PM2018-07-10T15:51:32+5:302018-07-10T15:53:04+5:30

महत्वाची बाब म्हणजे सकाळी उठल्यावर त्यांना यातलं काहीही आठवत नाही. हे असं का होतं हे आज आपण जाणून घेऊया....

This is why people walk during sleep | काही लोकांना का असते झोपेत चालण्याची सवय?

काही लोकांना का असते झोपेत चालण्याची सवय?

Next

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल, वाचलं असेल की, काही लोकांना झोपेत चालण्याची सवय असते. पण हे असं का आणि कसं होतं? हा प्रश्न अनेकांच्या मनात नेहमीच असतो. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना झोपेत चालण्याची सवय असते. महत्वाची बाब म्हणजे सकाळी उठल्यावर त्यांना यातलं काहीही आठवत नाही. हे असं का होतं हे आज आपण जाणून घेऊया....

आपल्या मेंदुत दोन प्रकारचे केमिकल तयार होतात. एक झोपताना आणि एक आपण जागतो तेव्हा... हे केमिकल नियंत्रित राहिल्यास आपल्याला झोप येते. यातील कोणतही केमिकल डिस्टर्ब झाल्यास काही लोक झोपेत चालू लागतात. याचा अर्थ हा होतो की, झोपल्यानंतरही तुमचं शरीर अॅक्टीव्ह असतं.  

जास्तीत जास्त लोक हे गार झोपेत आणि 'नॉन रॅपिड आय मूव्हमेंट'  (NREM) च्या अवस्थेच चालतात. झोपेत चालताना त्यांनी काय केलं हे त्यांच्या लक्षात राहत नाही. कारण झोपेत लोक NREM यानी नॉन रॅपिड आय मुव्हमेंटमध्ये चालतात आणि हा आपल्या स्मरणशक्तीचा भाग नसतो.  

झोपेत चालण्याची सवय जास्तकरून लहान मुलांमध्ये बघायला मिळते. लहान मुलांच्या शरीरात GABA नामक केमिकल असतो. या केमिकलमुळेच झोप येते. पण काही मुलांच्या शरीरात हे केमिकल कमी प्रमाणात असतं. त्यामुळे ते झोपेत चालतात. तर मोठ्यांना झोपेत चालण्याची सवय असण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. त्यात तणाव, थकवा आणि जास्त कॅफिनचं सेवन ही मुख्य कारणे सांगता येतील.

यासोबतच कमी झोप घेणे, मानसिक तणाव, अल्कोहोल, डिप्रेशन आणि एखाद्या गोष्टीती जास्त चिंता हेही कारण असू शकतात. जर तुम्हालाही झोपेत चालण्याची सवय असेल तर त्याचं कारण आधी माहीत करून घ्यायला हवं. त्यानंतर त्यावर डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घ्यायला हवे.
 

Web Title: This is why people walk during sleep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.