लसणाची एक कळी रात्री झोपताना उशाखाली का ठेवावी? फायदे वाचून व्हाल अवाक्....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 11:30 AM2022-06-18T11:30:21+5:302022-06-18T11:30:36+5:30

Garlic benefits : पूर्वीच्याकाळी लसूण घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवला जायचा. यामुळे घरातील हवेमध्ये असलेले रोगजंतू नाहीसे व्हायचे. त्याचसोबत लसूण नकारात्मक उर्जा खेचून घरामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करतो.

Why should garlic keep it under the pillow during sleep, these are a lot of benefits | लसणाची एक कळी रात्री झोपताना उशाखाली का ठेवावी? फायदे वाचून व्हाल अवाक्....

लसणाची एक कळी रात्री झोपताना उशाखाली का ठेवावी? फायदे वाचून व्हाल अवाक्....

googlenewsNext

Garlic benefits : लसूण खाण्याच्या अनेक फायद्यांविषयी आपल्याला माहित असेल. मात्र तुम्हाला माहिती आहे का लसणाचं फक्त सेवन करण्यानेच नाही तर रात्री झोपताना उशाखाली ठेवणंही खूप फायद्याचं आहे. आहारात लसणाचा समावेश करण्यासोबत दररोज रात्री झोपताना उशीखाली लसणाची एक पाकळी जरूर ठेवा. आता याचा नेमका काय फायदा आहे, तेसुद्धा पाहुयात.

पूर्वीच्याकाळी लसूण घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवला जायचा. यामुळे घरातील हवेमध्ये असलेले रोगजंतू नाहीसे व्हायचे. त्याचसोबत लसूण नकारात्मक उर्जा खेचून घरामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करतो. यामुळे अनेक लोक लसणाची पाकळी (Garlic Cloves Benefits) आपल्या उशाखाली घेऊन झोपतात. उशीखाली लसणाची पाकळी उशीखाली ठेऊन झोपल्याने शांत झोप लागते.

हल्ली आपली जीवनशैली खूपच धावपळीची आणि व्यस्त झाली आहे. आपण सतत शरीराने असो किंवा मेंदूने कुठेतरी गुंतलेले असतो. अशा परीस्थितीत आपला शरीराला आणि मेंदूला शांततेची आणि आरामाची नितांत गरज असते. मात्र अनेकदा आपल्यालों अशी शांत झोप लागत नाही. मग यासाठी आपण काही घरगुती उपाय वापरतो. अन्यथा टॅब्लेट्स घेतो. पण यासाठी एक लसणाची पाकळीही पुरेशी आहे.

- कोलेस्टेरॉल, रक्तदाब, हृदयविकार यांसारख्या अनेक रोगांवर लसूण उपयोगी आहे. कर्करोगाचा धोका टाळण्याचे गुणही लसणीत आहेत. 

- रोगप्रतिकाराक शक्ती असते. पूर्वी लसणाचा कांदा घराच्या कोपऱ्या ठेवला जायचा. कारण हवेतील रोगजंतू नाहीसे व्हायचे.  लसूण उशीखाली घेऊन झोपल्यामुळे चांगली झोप लागते. 

- लसूण ही नकारात्मक उर्जा खेचून घेते आणि सकारात्मक उर्जा देते त्यामुळे आजही अनेक लोक लसणीची किमान एक पाकळी तरी आपल्या उशाखाली घेऊन झोपतात.

- लसूण हा उष्ण व तीष्ण गुणात्मक असल्याने वात व कफनाशक आहे.  

- पोटात गॅस तयार होण्यापासून लसूण प्रतिबंध करते.  हृदयासाठीही उपयुक्त असून शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करून उपकारक कोलेस्टेरॉल वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. 

- लसणीमधील पोटॅशियम शरीरातील पाण्यावर नियंत्रण ठेवते व त्या योगे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. हृदयाची स्पंदनेही नियंत्रित ठेवण्यास या पोटॅशियमचा उपयोग होतो. 

- लसणात असलेले ‘क’ जीवनसत्त्व, ई जीवनसत्त्व व जस्त यांचा रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहण्यास उपयोग होतो. 

- लसणात अ‍ॅलिसिन नावाचे औषधी तत्त्व असते. त्यामुळे बुरशीचा संसर्ग, जीवाणू, विषाणू संसर्ग बरे होण्यास मदत होते.

Web Title: Why should garlic keep it under the pillow during sleep, these are a lot of benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.