हृदयरोग असलेल्यांनी पाणी कमी प्यावं? जाणून घ्या यामागचं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 11:30 AM2024-01-02T11:30:20+5:302024-01-02T11:32:44+5:30

Heart patient Tips : सामान्यपणे पाणी प्यायल्याने आरोग्याला फायदा मिळतो. पण जसा विषय हृदयरोगांच्या रूग्णांचा येतो तेव्हा हा नियम लागू पडत नाही.

Why should heart patients drink less water? How much water beneficial for heart patient | हृदयरोग असलेल्यांनी पाणी कमी प्यावं? जाणून घ्या यामागचं कारण...

हृदयरोग असलेल्यांनी पाणी कमी प्यावं? जाणून घ्या यामागचं कारण...

Heart patient Tips : सामान्यपणे असंच ऐकायला मिळतं की, चांगल्या आरोग्यासाठी भरपूर पाणी पिणं गरजेचं असतं. सल्ला दिला जातो की, दिवसभरातून कमीत कमी 7 ते 8 ग्लास पाणी प्यावे. काही लोक सांगतात की, निरोगी राहण्यासाठी रोज कमीत कमी 2 ते 4 लीटर पाणी प्यावे. असो, सामान्यपणे पाणी प्यायल्याने आरोग्याला फायदा मिळतो. पण जसा विषय हृदयरोगांच्या रूग्णांचा येतो तेव्हा हा नियम लागू पडत नाही. त्यांना पाणी कमी पिण्याचा सल्ला दिला जातो. हे आम्ही नाही तर एक्सपर्ट्स सांगतात. चला जाणून घेऊन  हृदयरोगाच्या रूग्णांनी पाणी कमी प्यावं का? दिवसभरातून किती पाणी प्यावे?

पाणी कमी का प्यावं?

एक्सपर्ट्सनुसार, हृदयरोगाच्या रूग्णांनी जास्त पाणी पिऊ नये. यामुळे त्यांना हार्ट अटॅक येण्याचा धोका कमी होतो. केवळ पाणी नाहीतर इतर पेय पदार्थ जसे की, ज्यूस, दूधही कमी प्यावं. याचं कारण हार्टच्या रूग्णांनी जास्त पाणी प्यायल्याने पाणी फुप्फुसात जास्त जमा होऊ लागतं ज्यामुळे पाय, मांड्या आणि कंबरेवर सूज येऊ लागते. ज्यामुळे तुमच्या हृदयाला जास्त मेहनत करावी लागते. इतकंच नाहीतर  फुप्फुसांमध्ये पाणी जमा होण्याचा धोकाही वाढतो. ज्यामुळे रूग्णाला श्वास घेण्यास समस्या होऊ शकते.

किती पाणी प्यावं?

तसं तर एका निरोगी व्यक्तीने कमीत कमी 7 ते 8 ग्लास पाणी प्यायला हवं. पण हार्टच्या रूग्णांनी हिवाळ्यात दिवसभरात दीड लीटर पाणी प्यावं. तेच उन्हाळ्यात कमीत कमी दोन लीटर पाणी प्यावं. हृदयरोग असलेल्यांनी पाणी एकाचवेळी नाही तर थोड्या थोड्या वेळाने प्यायलं पाहिजे. एकाचवेळी जास्त पाणी प्यायल्याने हृदयाला जास्त मेहनत करावी लागते. ज्यामुळे रूग्णाला श्वास घेण्यास समस्या होऊ शकते.

कधी होतं क्रोनिक डिहाइड्रेशन?

जर सहा महिन्यांपासून सतत शरीरात पाणी कमी असेल तर यामुळे क्रोनिक हायपोटेंशनची समस्या होऊ शकते. हायपोटेंशनला सोप्या भाषेत सांगायचं तर ब्लड प्रेशर लो होणं. जर शरीरात 2 ते 5 टक्के दरम्यान पाणी कमी झालं तर याला माइल्ड डिहायड्रेशन म्हणतात. तेच जर 5 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पाणी कमी झालं तर याला क्रोनिक डिहायड्रेशन म्हटलं जातं.

Web Title: Why should heart patients drink less water? How much water beneficial for heart patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.