उन्हाळ्यातही सकाळी कोमट पाणी प्यावं का? जाणून घ्या योग्य पद्धत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 12:37 PM2023-03-21T12:37:48+5:302023-03-21T12:38:01+5:30
Best Way To Drink Lukewarm Water : कोविड, इंफ्लूएंजा व्हायरसचा धोका आणि लक्षणांना दूर ठेवण्यासाठी एक मजबूत मेटाबॉलिज्म आणि इम्यून सिस्टीम बनवणं गरजेचं आहे. सकाळी कोमट पाणी प्यायल्याने शरीरात इलेक्ट्रोलाइटचं संतुलन बनवून ठेवण्यास मदत मिळते.
Best Way To Drink Lukewarm Water : सकाळी कोमट पाणी पिण्याचे अनेक फायदे तुम्हाला माहीत आहेतच. पण अनेकांना असाही प्रश्न पडतो की, उन्हाळ्यात सुद्धा सकाळी कोमट पाणी प्यावं की नाही? अशात डॉक्टर हेच सांगतात की, कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही सकाळी कोमट पाणी प्यायल्याने तुम्हाला फायदे मिळतात. फक्त ते कसं प्यावं याची पद्धत तुम्हाला माहीत असायला हवी आणि त्याचे फायदे काय होतात हेही माहीत असायला हवे. चला तर जाणून घेऊ...
कोमट पाणी का गरजेचं?
कोविड, इंफ्लूएंजा व्हायरसचा धोका आणि लक्षणांना दूर ठेवण्यासाठी एक मजबूत मेटाबॉलिज्म आणि इम्यून सिस्टीम बनवणं गरजेचं आहे. सकाळी कोमट पाणी प्यायल्याने शरीरात इलेक्ट्रोलाइटचं संतुलन बनवून ठेवण्यास मदत मिळते. तसेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासही मदत मिळते. त्याशिवाय सर्दी, खोकला, इन्फेक्शन याही समस्या दूर होतात.
बॉडी डिटॉक्स करतं
छातीतमध्ये दाटलेपणा कफ झाल्यामुळे होतो. याने फुप्फुसाचे वायुमार्ग ब्लॉक होतात. अशात कफ पातळ करण्यासाठी आणि तो शरीरातून बाहेर काढण्यासाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे सकाळी कोमट पाणी पिणे हा आहे. तसेच कोमट पाण्याने घशाची खवखव आणि सायनसची समस्याही दूर होते. चला आता हे पाणी पिण्याची पद्धत जाणून घेऊ.
1 लिटर कोमट पाणी घ्या
त्यात 1 लिंबू पिळा
2 चमचे मध टाका
हे चांगलं मिक्स करा आणि दिवसभर घोट घोट करून हे पाणी प्या.
मध आणि लिंबू दोन्हीमध्ये व्हिटॅमिन सी, डी, ई, के आणि बी कॉम्प्लेक्स आणि बीटा-कॅरोटीनसारखे पोषक भरपूर असतात. जे सर्दी, खोकला आणि फ्लूच्या उपचारासोबतच इम्यूनिटी वाढवण्यास मदत करतात.
दुसरी पद्धत -
रोज सकाळी कोमट पाणी प्यायल्याने पचन तंत्रातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत मिळते. कोमट पाण्याने शरीराचं तापमान वाढतं, ज्यामुळे मेटाबॉलिज्म रेट वाढतो. याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत मिळते.
1 लिटर पाणी घ्या
त्यात अर्धा लिंबाचा रस टाका
3-4 तुळशीची पाने
3-4 आल्याचे तुकडे
वजन कमी करण्यास मदत
जर तुम्ही फिटनेसबाबत जागरूक असाल तर पाणी तुमचा सगळ्यात चांगला साथीदार असला पाहिजे. सकाळी कोमट पाणी प्यायल्याने शरीरातून विषारी पदार्थ बाहेर निघतात. तसेच याने आतड्यांची सफाई होते. आतड्यांमध्ये चिकटलेले पदार्थ निघतात. त्यासोबतच अन्न पचनालाही याने मदत मिळते.
1 लिटर पाणी घ्या
1 छोटा चमचा जिरं टाका
1 छोटा चमचा धणे
1 छोटा चमचा मेथीचे दाणे
हे मिश्रण व्यवस्थित उकडा आणि हे पाणी थोडं थोडं करून दिवसभर प्या. याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत तर मिळेलच सोबतच शरीरातील विषारी पदार्थही बाहेर निघतील.