लसणाचा चहा पिऊन आरोग्याला मिळतात अनेक फायदे, जाणून घ्या कसा कराल तयार!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 01:19 PM2024-07-23T13:19:51+5:302024-07-23T13:20:32+5:30
Benefits of garlic tea : लसणाचा चहा आणि त्यापासून होणाऱ्या फायद्यांबाबत अनेकांना माहीत असेलच. लसणाचा चहा म्हणजेच गार्लिक टी एका पावरफुल टॉनिक मानलं जातं.
Benefits of garlic tea : पावसाळ्यात कफ, सर्दी, खोकला आणि ताप यांसारख्या समस्या अधिक होतात. तसेच इतरही अनेक आजार होण्याचा धोका या दिवसांमध्ये राहतो. या दिवसात होणाऱ्या या समस्यांपासून बचाव करण्यासाठी लसूण, आलं आणि काळे मिरे यांसारख्या उष्ण गुण असलेल्या पदार्थांचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच कफ आणि सर्दी दूर करण्यासाठी तर लसणाचा चहा अधिक फायदेशीर मानला जातो.
लसणाचा चहा आणि त्यापासून होणाऱ्या फायद्यांबाबत अनेकांना माहीत असेलच. लसणाचा चहा म्हणजेच गार्लिक टी एका पावरफुल टॉनिक मानलं जातं. ज्याने कफ आणि सर्दी-पळसा दूर करण्यास मदत मिळते.
अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, लसणाचा चहा हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी अधिक फायदेशीर असतो. आणि याने ब्लड प्रेशरही कंट्रोलमध्ये राहतं. तसेच याचा फायदा वजन कमी करण्यासही केला जातो. असे मानले जाते की, याने मेटाबॉलिज्म आणि पचनक्रिया मजबूत राहण्यासही मदत होते. एका रिसर्चनुसार, लसूण व्हजायनल इन्फेक्शन, माउथ अल्सर आणि पोटाच्या कॅन्सरवरही चांगला मानला जातो.
लसणाचा चहा पिण्याचे फायदे
इम्यूनिटी वाढते
लसणाचा चहामध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल, अॅंटी-फंगल आणि अॅंटी-वायरल गुण असतात. यांमुळे इम्यून सिस्टीम मजबूत होतं आणि शरीराचा इन्फेक्शनपासून बचाव होतो.
हृदयाला फायदे
लसणामध्ये असे तत्व असतात जे कोलेस्ट्रॉल लेव्हल आणि ब्लड प्रेशर कमी करतात. लसणाच्या चहामुळे हृदयरोगांचा धोका कमी होतो.
शरीर डिटॉक्स होतं
लसणाच्या चहामध्ये डिटॉक्सिफिकेशन गुण असतात जे लिव्हर, किडनी आणि इतर अवयवांना साफ करण्यास मदत करतात. याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
शरीरातील सूज कमी होते
लसणाच्या चहामध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात जे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात.
पचन तंत्र चांगलं राहतं
लसणाच्या चहामध्ये असे काही तत्व असतात जे पचनासंबंधी एंझाइम्स तयाक करतात आणि पचनक्रिया चांगली करतात.
वजन कमी होतं
लसणाच्या चहाचं सेवन करून तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळू शकते. कारण या चहामुळे मेटाबॉलिज्म मजबूत होतं आणि चरबी लवकर बर्न होते. तसेच याने भूकही कंट्रोल होते आणि जास्त वेळ पोट भरलं राहतं.
लसणाचा चहा करण्याची पद्धत