थंडीच्या दिवसात बाहेरचं खाऊन वाढतो आजारांचा धोका, जाणून घ्या काय टाळाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 04:58 PM2024-10-30T16:58:30+5:302024-10-30T16:59:19+5:30
Winter Care Tips : एक्सपर्टनुसार या दिवसात बाहेर पदार्थ खाणं पूर्णपणे टाळलं पाहिजे. काळजी घेतली नाही तर काही आजारांचा धोका वाढतो.
Winter Health Tips: आता थोडीफार थंडी जाणवायला लागली आहे. काही दिवसांमध्ये थंडीचा पारा वाढेल. हिवाळ्यात आरोग्यासंबंधी अनेक सल्ले एक्सपर्ट देत असतात. या दिवसांमध्ये खाण्या-पिण्याचीही खूप चंगळ असते. पण आरोग्याची काळजी घेणंही तेवढंच गरजेचं असतं. कारण या दिवसात तुम्ही जर आरोग्याकडे दुर्लक्ष केलं तर वेगवेगळ्या आजारांचा सामनाही करावा लागू शकतो. बरेच लोक या दिवसात बाहेरचे पदार्थ खातात. एक्सपर्टनुसार या दिवसात बाहेर पदार्थ खाणं पूर्णपणे टाळलं पाहिजे. काळजी घेतली नाही तर काही आजारांचा धोका वाढतो.
हिवाळ्यात बाहेरचं खाण्याचे नुकसान
हेल्थ एक्सपर्टनुसार, हिवाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणं घातक ठरू शकतं. कारण वातावरण बदलामुळे आणि थंडीमुळे इम्यूनिटी कमजोर होऊन आजारांचा धोका वाढतो. पचनक्रिया आणि मेटाबॉलिज्मवरही प्रभाव पडतो. त्यामुळे या दिवसात खाण्या-पिण्याची योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे. थंडीत बाहेर तळलेले, भाजलेले पदार्थ, मिठाई, डेअरी प्रोडक्ट्स, फास्ट फूड आणि जंक फूडसोबतच कोल्ड ड्रिंक आणि मॉकटेल इत्यादींचं सेवन टाळलं पाहिजे.
कोणत्या आजारांचा असतो धोका?
थंडीच्या दिवसात बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने सीजनल फ्लू, सर्दी, खोकला, घशात खवखव, वायरल ताप, डोकेदुखी आणि थंडी वाजण्याची समस्या होऊ शकते. त्याशिवाय पोट, लिव्हर, हार्ट, रेस्पिरेटरी सिस्टमसोबत कफ आणि घशातही समस्या होते. लहान मुले आणि वृद्धांमध्ये बाहेरचं खाल्ल्याने इन्फेक्शनचा धोकाही वाढतो. तसेच अपचन आणि डायरियाची देखील समस्या होऊ शकते.
कशी घ्याल काळजी?
थंडीच्या दिवसात बाहेर काही खाण्याऐवजी आवडीनुसार घरीच वेगवेगळे पदार्थ बनवून सेवन करू शकता. घरीच तुम्ही वेगवेगळ्या हेल्दी सूजचं सेवन करू शकता. घरीच बनवलेले गरमागरम आणि ताजी पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. कारण या दिवसात जास्तीत जास्त लोक घरातच जास्त वेळ राहत असल्याने आजारी पडण्याचा धोका असतो.