तुम्हीही टीव्हीसमोर झोपता का? जाणून घ्या याचा आरोग्यावर काय होतो परिणाम!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 12:54 PM2024-01-16T12:54:24+5:302024-01-16T12:56:15+5:30
बरेच लोक टीव्ही बघता बघता झोपतात. अनेकांना वाटतं की, त्यांना झोप येण्यासाठी ही बेस्ट बाब आहे. पण असं करणं घातक ठरू शकतं.
जास्तीत जास्त लोक रात्री उशीरापर्यंत टीव्ही बघतात. काही लोक नेटफ्लिक्सवर सीरिज बघतात तर कुणी यूट्यूबवर सिनेमा बघतात. टीव्ही बघण्यात काही वाईट नाही, पण जर तुम्ही टीव्ही बघता बघता झोपत असाल तर ही बाब तुमच्या आरोग्यासाठी फारच नुकसानकारक आहे. बरेच लोक टीव्ही बघता बघता झोपतात. अनेकांना वाटतं की, त्यांना झोप येण्यासाठी ही बेस्ट बाब आहे. पण असं करणं घातक ठरू शकतं.
भारतात अनेक लोकांना झोपण्याआधी टीव्ही बघण्याची सवय असते. पण रिसर्चनुसार, झोपताना टीव्ही बघितल्याने झोप डिस्टर्ब होते आणि यामुळे वजन वाढू शकतं. चला जाणून घेऊ याबाबत रिसर्च काय सांगतो.
2022 मधील स्टडीचा रिपोर्ट
शिकागोमधील नॉर्थवेस्टर्न यूनिवर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या रिसर्चर्सने 2022 मध्ये एक स्टडीचा हवाला देत सांगिलं की, 63 ते 84 वर्षाच्या काही लोकांना या रिसर्चमध्ये सहभागी करून घेण्यात आलं होतं. त्यांच्या एम्बिएंट लाइटचं प्रमाण आणि त्याच्या त्यांच्या आरोग्यावर होणार प्रभाव यावर लक्ष ठेवण्यात आलं.
स्टडीनुसार, जे लोक कमी प्रकाशात झोपतात, त्यांना डायबिटीस, लठ्ठपणा आणि हाय ब्लड प्रेशरचा धोका जास्त राहतो. त्यांनी असंही सांगितलं की, टीव्ही किंवा मोबाइलच्या प्रकाशातही झोपले तर त्यांना सकाळी इंसुलिन रजिस्टेंस जास्त होता. ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित करण्याची क्षमता प्रभावित झाली.
रात्री टीव्हीच्या प्रकाशात मेलाटोनिन लेव्हल कमी होते. ज्यामुळे झोप बिघडते. त्याशिवाय डायबिटीस आणि हाय ब्लड प्रेशरचा धोकाही वाढतो.
ब्लू लाइट सर्केडियन रिदम प्रभावित करतं
आर्टिफिशियल ब्लू लाइटच्या संपर्कात राहिल्याने मेलाटोनिन कमी होतं. ज्यामुळे तुम्हाला इच्छा असूनही झोप येत नाही. जे लोक इंसोमनियाने पीडित असतात त्यांना सल्ला दिला जातो की, लाइटच्या संपर्कात कमी रहावं. जेणेकरून चांगली झोप लागावी.