रात्री काहीच न खाता झोपल्याने वजन कमी होतं का? जाणून घ्या फॅक्ट्स...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 10:43 AM2019-09-21T10:43:51+5:302019-09-21T10:44:37+5:30
वजन कमी करण्यासाठी काही लोक रात्री उपाशा पोटीच झोपतात. ही सवय अनेकांमध्ये पाहिली जाते. ही सवय अशा लोकांमध्ये अधिक आढळते जे लोक कामांमध्ये फार व्यस्त असतात.
वजन कमी करण्यासाठी काही लोक रात्री अनोशा पोटीच झोपतात. ही सवय अनेकांमध्ये पाहिली जाते. ही सवय अशा लोकांमध्ये अधिक आढळते जे लोक कामांमध्ये फार व्यस्त असतात. काही लोकांना तर वजन कमी करण्याची चिंता असते, त्यामुळे ते रात्री जेवण करत नाहीत. पण असं करून फायदा नाही तर नुकसानच होतं. त्यामुळे याबाबत योग्य माहिती असणं गरजेचं आहे. कारण उपाशी झोपणं फारच घातक आहे. चला जाणून घेऊ असं करून होणाऱ्या नुकसानांबाबत...
ऊर्जेचा स्तर होतो कमी
जे लोक नेहमी अनोशा पोटी झोपतात त्यांच्या शरीरात अनेकप्रकारच्या व्हिटॅमिन्सची कमतरता होते आणि ऊर्जा कमी होण्याची समस्याही होते. रात्री काहीच न खाता झोपले तर दुसऱ्या दिवशी खूप जास्त थकवा जाणवतो आणि शरीर कमजोर होऊ लागतं. उपाशा पोटी झोपण्यापेक्षा रात्री थोडं दूध प्यावं.
मेटाबॉलिज्म होतं कमजोर
तुम्ही नेहमीच अनोशा पोटी झोपत असाल तुम्हाला वेळीच सावध होणं गरजेचं आहे. कारण अनोशा पोटी झोपल्याने शरीराचं मेटाबॉलिज्म कमजोर होऊ लागतं. मेटाबॉलिज्म कमजोर झाल्यास वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागण्याची शक्यता असते. ज्यांचं मेटाबॉलिज्म कमजोर असतं, त्यांना डायबिटीस आणि लठ्ठपणा यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
चांगली झोप येणार नाही
जर तुम्ही अनोशा पोटी झोपत असाल तर तुम्हाला झोप न येण्याची समस्या होऊ शकते. उपाशी झोपल्याने अनेकांना अॅसिडीटी आणि गॅसची समस्या होऊ लागते. रात्री जर चांगली झोप हवी असेल तर जेवण करायलाच पाहिजे. तसेच रात्री पुरेशी आणि चांगली झोप झाली नाही तर व्यक्तीचा स्ट्रेस वाढू लागतो आणि वेगवेगळे आजारही होतात.
वजन वाढण्याचा धोका
रात्री काहीच न खाता झोपल्याने वजन वाढण्याची शक्यता अधिक जास्त असते. काही लोकांना वाटतं की, रात्री जेवण केलं नाही तर वजन कमी होईल. पण यात काहीच तथ्य नाही. जे रात्री काहीच न खाता झोपतात, त्यांचं वजन वाढू लागतं. जर तुम्हाला वजनाची भीती असेल तर रात्री हलकं काहीतरी खावं.
पोषक तत्व आणि व्हिटॅमिनची कमतरता
जर तुम्ही नेहमीच रात्री जेवण करत नसाल किंवा काहीच न खाता झोपत असाल तर तुमच्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता होऊ शकते. पोषक तत्वांसोबतच शरीरात व्हिटॅमिनची सुद्धा कमतरता होऊ लागते. या दोन्ही गोष्टी शरीरातून कमी झाल्या तर व्यक्ती वेगवेगळ्या आजारांचा धोका वाढतो. जर आजार टाळायचे असतील रात्री उपाशी झोपू नये.