उलटं चाला, अधिक कॅलरी बर्न करा; शरीर अन् मनाच्या एकाग्रतेसाठीही Reverse Walking फायदेशीर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 12:53 PM2024-05-25T12:53:41+5:302024-05-25T12:54:11+5:30
Benefits Of Reverse Walk : उलटं चालल्याने शरीराला वजन कमी करण्यापासून ते मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्याचेही फायदे होतात. रिव्हर्स वॉकने शरीराची क्षमताही वाढते.
Benefits Of Reverse Walk :एकंदर आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी पायी चालण्याचे किती फायदे होतात हे तुम्हाला माहीत असेलच. बरेच लोक आता सकाळी आणि सायंकाळी वेळ काढून चालायला जाताना दिसतात. बरेच लोक जेवण केल्यावर काही मिनिटे वॉक करतात. डॉक्टरही जेवल्यावर वॉक करण्याचा सल्ला देतात. पण तुम्हाला सरळ चालण्याऐवजी रिव्हर्स वॉक करण्याचे म्हणजे उलटं चालण्याचे फायदे माहीत नसतील. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
उलटं चालल्याने शरीराला वजन कमी करण्यापासून ते मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्याचेही फायदे होतात. रिव्हर्स वॉकने शरीराची क्षमताही वाढते. रोज १५ मिनिटे रिव्हर्स वॉक केल्याने शरीरात अनेक बदल होतात. याने काय काय फायदे होतात याचा योगा एक्सपर्ट मृणालिनी यांचा व्हिडीओही तुम्ही बघू शकता.
एकाग्रता वाढते
सरळ चालत असताना तुमचं लक्ष आजूबाजूच्या गोष्टींवर जाऊ शकतं. म्हणजे चालताना तुम्ही एकाग्र नसता. तेच उलटं चालल्याने तुमचा मेंदू त्यातच गुंतलेला असतो. त्यामुळे तुमची एकाग्रताही वाढते. मेंदुचं आरोग्य चांगलं राहतं.
कॅलरी जास्त बर्न होतात
सरळ चालण्याच्या तुलनेत उलटं चालण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागते. रिसर्चनुसार, उलटं चालल्याने तुम्ही तुमचं वजन लवकर कमी करु शकता. कारण उलटं चालल्याने तुमच्या २० टक्के कॅलरी जास्त बर्न होतात.
गुडघेदुखी होते दूर
ज्यांच्या गुडघ्यात वेदना आहेत आणि ते रिकव्हरी मोडवर आहेत ते बॅकवर्ड वॉक किंवा रिव्हर्स वॉकच्या माध्यमातून आपले गुडघे आधीपेक्षा जास्त मजूबत करू शकता. सरळ चालण्याच्या तुलनेत रिव्हर्स वॉक केल्याने गुडघ्यांवर दबावही कमी पडतो.
शरीराचं पोश्चर होतं चांगलं
उलटं चालल्याने तुम्हाला सरळ चालण्याच्या तुलनेत पाठ जास्त ताठ ठेवून चालावं लागतं. हात सरळ ठेवावे लागतात आणि पाय सुद्धा अधिक सरळ ठेवावे लागतात. यामुळे कंबरदुखीसारखी समस्याही दूर होते आणि शरीराचं पोश्चरही चांगलं होतं.