Sleeping Tips: रात्री चुकूनही लाइट ऑन करून झोपू नका, नुकसान वाचून पुन्हा कधीच असं करणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 04:58 PM2022-09-01T16:58:24+5:302022-09-01T16:58:33+5:30
Sleeping While Light On: एक चांगली झोप घेतली तर तुमचा मेंदूही चांगल्याप्रकारे काम करू शकतो. याने आपल्या मसल्स रिकव्हर होऊ लागतात. मूड चांगला राहतो आणि अनेक आजारांचा धोकाही कमी केला जाऊ शकतो.
Sleeping While Light On: जास्तीत जास्त हेल्थ एक्सपर्ट हेच सांगतात की, एका वयस्क व्यक्तीच्या चांगल्या आऱोग्यासाठी त्यांनी दिवसातून कमीत कमी 8 तास झोप घ्यावी. झोप एका थेरपीप्रमाणे असते. ज्यामुळे शरीराचा थकवा दूर होतो. एक चांगली झोप घेतली तर तुमचा मेंदूही चांगल्याप्रकारे काम करू शकतो. याने आपल्या मसल्स रिकव्हर होऊ लागतात. मूड चांगला राहतो आणि अनेक आजारांचा धोकाही कमी केला जाऊ शकतो. पण झोपण्यातही आपल्या काळजी घ्यावी लागते. नाही तर एक चूक महागात पडू शकते.
झोपताना कधीच करू नका ही चूक
सामान्यपणे सगळेच रात्री झोपताना रूममधील लाइट बंद करतात. जेणेकरून आपल्याला चांगली झोप लागावी. पण काही लोक असं करत नाहीत. ते लाइट चालू ठेवून झोपणं पसंत करतात किंवा आळशामुळे लाइट बंद करत नाहीत. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, लाइट चालू ठेवून झोपणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतं. यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
1) डिप्रेशन
एक आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी जेवढी प्रकाशाची गरज असते, तेवढाचा अंधारही महत्वाचा आहे. तुम्ही ऐकलं असेल की, स्वीडन आणि नॉर्वेसारख्या ध्रुवीय देशांमध्ये उन्हाळ्यात साधारण 6 महिने सूर्य निघत नाही. ज्यामुळे बरेच लोक डिप्रेशनचे शिकार होतात. तेच भारतासारख्या देशात जर तुम्हाला प्रकाशात झोपायचं असेल तर यासाठी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक लाइटचा वापर करावा लागतो. यातून निघणारा निळा प्रकाश तुमची चिडचिड वाढवू शकतो. त्यामुळे शक्य तेवढ्या कमी प्रकाश झोपण्याचा प्रयत्न करा.
2) अनेक आजारांचा धोका
जर तुम्ही नेहमीच लाइट सुरू ठेवून झोपत असाल तर अर्थातच तुम्हाला चांगली झोप लागत नसेल. यामुळे तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जसे की, हाय ब्लड प्रेशर, हार्ट डिजीज इत्यादी. त्यामुळे कधीही लाइट सुरू करून झोपण्याची चूक करू नका.
3) थकवा
सामान्यपणे लाइट सुरू करून झोपल्याने तुमची झोप पूर्ण होत नाही. ज्याचा प्रभाव दुसऱ्या दिवशी बघायला मिळतो. याने तुम्हाला दुसऱ्या दिवशी काम करताना समस्या होते. कारण तुम्हाला थकवा आणि सुस्ती जाणवते.