जाणून घ्या; ऑफिसमध्ये फक्त महिलांनाच का होतो AC टेम्प्रेचरचा प्रॉब्लेम?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 12:19 PM2019-08-05T12:19:24+5:302019-08-05T12:24:48+5:30

तुमच्या ऑफिसमध्ये अनेकदा एसीवरून वादावादी होत असेलच... पण तुम्ही नोटीस केलं असेल तर महिलांना एसीच्या कूलिंगची समस्या अधिक जाणवताना दिसेल. जर तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहिलतं तर ऑफिसमधील महिला  स्वेटशर्ट, जॅकेट किंवा स्टोल कॅरी करताना दिसून येतील.

Why women complain about ac temperature in office | जाणून घ्या; ऑफिसमध्ये फक्त महिलांनाच का होतो AC टेम्प्रेचरचा प्रॉब्लेम?

जाणून घ्या; ऑफिसमध्ये फक्त महिलांनाच का होतो AC टेम्प्रेचरचा प्रॉब्लेम?

Next

तुमच्या ऑफिसमध्ये अनेकदा एसीवरून वादावादी होत असेलच... पण तुम्ही नोटीस केलं असेल तर महिलांना एसीच्या कूलिंगची समस्या अधिक जाणवताना दिसेल. जर तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहिलतं तर ऑफिसमधील महिला  स्वेटशर्ट, जॅकेट किंवा स्टोल कॅरी करताना दिसून येतील. पण तेच तुम्हाला पुरूषांबाबत अजिबात दिसणार नाही. तुम्ही मान्य करा किंवा नका करू, आता विज्ञानानेही मान्य केलं आहे की, थंडीचा महिला आणि पुरूषांवर वेगवेगळा परिणाम दिसून येतो. 

काय म्हणतं संशोधन

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, PLOS ONE मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका संशोधनामध्ये, महिलांना जास्त कूलिंग अजिबात सहन होत नाही, पण तेच जर ऑफिसमधील तापमान जास्त असेल तर त्यांचा परफॉर्मन्स उत्तम असतो. त्यांना काम करताना कोणत्याच अडचणींचा सामना करावा लागत नाही. पण याउलट पुरूषांच्या बाबतीत असतं. पुरूषांना जास्त तापमान अजिबात सहन होत नाही. या संशोधनासाठी संशोधकांनी 500 लोकांचे 24 ग्रुप तयार केले. त्यांनी 61 ते 91 डिग्री फॉरेनहाइटवर अनेक निरिक्षणं नोंदविली. शेवटी असं सिद्ध झालं की, महिलांनी जास्त तापमानात उत्तम काम केलं आणि जास्त प्रश्नांची उत्तरं दिली. तर पुरूषांनी कमी तापमानात चांगलं काम केलं. 

तुम्हाला कदाचित हे ऐकून आश्चर्य वाटेल की, जास्तीत जास्त ऑफिस बिल्डिंग्समध्ये टेम्प्रेचर अशाप्रकारे सेट करण्यात आलेलं असतं, जे पुरूषांसाठी आरामदायक असतं. 

(Image Credit : coolingpost.com)

... म्हणून महिलांना जास्त थंडी वाजते

संशोधनामध्ये सांगितल्यानुसार, महिलांच्या शरीराचा मेटाबॉलिक रेट पुरूषांपेक्षा फार कमी असतो. तसेच त्यांचं शरीर कमी उष्णता रिलिज करतं. त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये उष्णता अजिबात राहत नाही. 

(Image Credit : Holborn Group)

महिलांसाठी एवढं तापमान अनुकूल 

महिला 77 डिग्री फॉरेनहाइट म्हणजेच, 25 डिग्री तापमान उत्तम असतं. तसेच पुरूषांसाठी 72 डिग्री फॉरेनहाइट 22 डिग्री सेल्सिअस पुरूषांसाठी कम्फर्टेबल असतं. 

टिप : वरील सर्व गोष्टी संशोधनातून सिद्ध झालेल्या असून त्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत फायदेशीर ठरतं. 

Web Title: Why women complain about ac temperature in office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.