आज 'जागतिक रेडिओग्राफी दिवस' का साजरा केला जातो ? एक्स रे चा शोध कसा लागला जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 10:03 AM2022-11-08T10:03:45+5:302022-11-08T10:10:51+5:30
रेडिओग्राफी क्षेत्राविषयी जागरुकता निर्माण व्हावी म्हणून दरवर्षी ८ नोव्हेंबर ला जागतिक रेडिओग्राफी दिवस साजरा केला जातो. रेडिओग्राफी चा शोध कसा लागला ?
रेडिओग्राफी म्हणलं की आठवतं ते म्हणजे एक्स रे. शरिरातील अवयवांमध्ये होत असणाऱ्या त्रासाचे नेमके निदान करण्यासाठी एक्स रे मशीन वापरली जाते. आता तंत्रज्ञान आणखीनच विकसित झाले आहे. सीआर, एमआरआय, एंजिओग्राफी यासारख्या तंत्राचा वापर होत आहे. यामुळे रुग्णांनाही आजाराची इत्थंभूत माहिती मिळते. रेडिओग्राफी क्षेत्राविषयी जागरुकता निर्माण व्हावी म्हणून दरवर्षी ८ नोव्हेंबर ला जागतिक रेडिओग्राफी दिवस साजरा केला जातो.
रेडिओग्राफी चा शोध कसा लागला ?
जागतिक रेडिओग्राफी दिवस २०१२ पासून साजरा केला जातो. ८ नोव्हेंबर १८९५ रोजी जर्मनीच्या वारबर्ग विद्यापिठाच्या फिजिक्स प्राध्यापक विल्हेम कॉलरैड रॉटंटजेन यांनी एक्स रे चा शोध लावला. तर पहिला एक्स रे त्यांनी पत्नी बर्थाच्या हाताचा काढला. सुरुवातीला एक्स रे चा वापर करणे तसे कठीण होते. रेडिओग्राफरला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र काळानुसार रेडिओग्राफीमध्ये अनेक बदल झाले. यामुळेच आज अनेक आजारांचे त्वरित विदान होते.
रेडिओग्राफी दिवसाचे महत्व
जगभरात हा दिवस रेडिओग्राफी जागरुकता अभियान म्हणून साजरा केला जातो. याचा मूळ उद्देश लोकांना रेडिओग्राफीमुळे होणाऱ्या फायद्याची माहिती देणे हा आहे.जेणेकरुन वेळीच आजाराचे निदान होइल. आजही अनेक छोट्या छोट्या गावांमध्ये लोक रेडिओग्राफीपासून लांब राहतात. यामुळेच वेळीच योग्य उपचार न मिळाल्याने गावातील मृत्युदर अधिक असतो. या दिवशी अनेक रेडिओग्राफी असोसिएशन आणि सोसायटी मोफत टेस्ट आणि एक्स रे चाचणी शिबिर ठेवते. हजारो लोक याचा लाभ घेतात.