लिव्हरसाठी दारूसारखंच घातक आहे 'या' भांड्यांमध्ये जेवण बनवणं, वेळीच व्हा सावध!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 12:28 PM2023-09-14T12:28:59+5:302023-09-14T12:29:33+5:30
लिव्हर खराब झाल्यावर शरीराची आतून सफाई बंद होते. ज्यामुळे आरोग्य बिघडतं आणि वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात.
लिव्हर आपल्या शरीरातील एक महत्वाचा अवयव आहे. ज्यामुळे पूर्ण शरीर आतून स्वच्छ राहतं. वेगवेगळ्या कारणांनी शरीरात केमिकल्स वाढतात, जे काढण्याचं काम लिव्हर करतं. बाइल, कोलेस्ट्रॉलसारख्या महत्वाच्या गोष्टींचं निर्माणही लिव्हर करतं.
लिव्हर खराब झाल्यावर शरीराची आतून सफाई बंद होते. ज्यामुळे आरोग्य बिघडतं आणि वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात. लिव्हरच्या आजाराची लक्षणं फार नंतर दिसू लागतात. ज्यात काविळ, पोटदुखी, पोटावर सूज, खाज, डार्क रंगाची लघवी, नेहमी थकवा जाणवणे, भूक कमी लागे आणि उलटी यांचा समावेश आहे.
या सवयींमुळे खराब होतं लिव्हर
जास्त दारू पिणं, अनहेल्दी फॅट आणि शुगरचं अधिक सेवन, जास्त औषधं घेणं, स्मोकिंग करणं, अॅल्युमिनिअम आणि टेफ्लोनच्या भांड्यात जेवण तयार करणं, एक्सरसाइज न करणं, हायड्रेशनकडे लक्ष न देणं.
या भांड्यात बनवू नका जेवण
न्यूट्रिशनिस्ट जूही कपूर यांनी सांगितलं की, अॅल्युमिनिअम आणि टेफ्लोनची भांडी लिव्हरसाठी घातक ठरू शकतात. असं मानलं जतं की, या भांड्यांमध्ये जेवण तयार केल्याने शरीरात काही केमिकल्स वाढतात. जे लिव्हरचं काम बिघडवू शकतात.
वाढू देऊ नका लठ्ठपणा
लठ्ठपणा आणि लिव्हरच्या आजाराचा थेट संबंध आहे. यामुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिजीज होऊ शकतो. बेटरहेल्थ चॅनलनुसार, या आजारात लिव्हरच्या सेल्समध्ये फॅट जमा होतं आणि इन्फ्लामेशन वाढतं. हळूहळू हा आजार लिव्हर सिरोसिस बनतो.
लिव्हर हेल्दी ठेवण्यासाठी काय करावं?
वजन वाढू देऊ नका
फायबर, हेल्दी फूड असलेला आहार घ्या
रोज एक्सरसाइज करा
मद्यसेवन बंद करा
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेऊ नका
हात चांगले धुवून जेवण करा