रात्री झोपण्याआधी तळपायांवर लावा हे तेल, बेडवर पडल्या पडल्या येईल झोप!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 10:38 AM2024-06-18T10:38:16+5:302024-06-18T10:39:17+5:30

Sleeping Tips : तुम्ही जर तळपायांना मोहरीचं तेल लावाल तर तुम्हाला चांगली झोप येऊ शकते. अशात मोहरीचं तेल तळपायांना लावल्याने काय फायदे मिळतात हे जाणून घेऊ.

Why you should do mustard oil massage on your feet? Know the benefits | रात्री झोपण्याआधी तळपायांवर लावा हे तेल, बेडवर पडल्या पडल्या येईल झोप!

रात्री झोपण्याआधी तळपायांवर लावा हे तेल, बेडवर पडल्या पडल्या येईल झोप!

Sleeping Tips : दिवसभर वेगवेगळ्या कामांसाठी धावपळ केल्यावर कुणालाही असंच वाटत असतं की, बेडवर पडल्या पडल्यांना त्यांना शांत झोप लागावी. त्यासाठी लोक वेगवेगळे उपायही करत असतात. काही लोकांना चांगली झोप येत तर काही लोकांना येत नाही. अशात तुम्हालाही झोप न येण्याची समस्या असेल किंवा लवकर झोप येतच नसेल तर एक खास उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. रात्री जर तुम्ही झोपण्याआधी तळपायांवर एक तेल लावलं तर तुम्हाला लगेच आणि चांगली झोप येण्यास मदत मिळू शकते. तुम्ही जर तळपायांना मोहरीचं तेल लावाल तर तुम्हाला चांगली झोप येऊ शकते. अशात मोहरीचं तेल तळपायांना लावल्याने काय फायदे मिळतात हे जाणून घेऊ.

मोहरीच्या तेलाने तळपायांची मालिश करण्याचे फायदे

चांगली झोप लागते

रात्री जर तुम्हाला लवकर आणि चांगली झोप येत नसेल तर मोहरीचं तेल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. मोहरीच्या तेलाने तळपायांची मालिश करा. याने तुम्हाला चांगली झोप येईल.

तणाव होईल कमी 

तळपायांची तेलाने मालिश केल्याने मेंदुमध्ये ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं. ज्यामुळे चांगली झोपही येते. सोबतच तुमचा मानसिक तणावही कमी होतो.

ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं

रात्री झोपण्याआधी तळपायांची मोहरीच्या तेलाने मालिश केल्यावर चांगली झोप येते. तसेच तेलाने मालिश केल्याने शरीरात ब्लड सर्कुलेशन सुरळती होतं. याने ब्लड प्रेशरही कंट्रोलमध्ये राहण्यात मदत मिळते.

डोकं होईल शांत

डोकं शांत करण्यासाठी आणि चिंता दूर करण्यासाठी रात्री झोपण्याआधी मोहरीच्या तेलाने तळपायांची मालिश करा. याने तुम्हाला फायदे होईल. 

मासिक पाळीच्या वेदना कमी होतील

तळपायांची मोहरीच्या तेलाने मालिश केल्याने तुम्हाला मासिक पाळीत होणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत होईल. 

Web Title: Why you should do mustard oil massage on your feet? Know the benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.