फ्रिजचं गारेगार पाणी करू शकतं तुम्हाला आजारी, वाचा उन्हाळ्यात होणारे नुकसान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 14:47 IST2025-03-03T14:46:23+5:302025-03-03T14:47:11+5:30
Cold Water Side Effects in Summer : अनेकांना हे माहीत नसतं की, उन्हाळ्यात फ्रिजमधील थंड पाणी पिणं म्हणजे तुम्ही तुमच्या आरोग्यासोबत खेळ करण्यासारखं आहे.

फ्रिजचं गारेगार पाणी करू शकतं तुम्हाला आजारी, वाचा उन्हाळ्यात होणारे नुकसान!
Cold Water Side Effects in Summer : आता उन्हाचा पारा वाढायला सुरूवात झाली असून बरेच लोक फ्रीजमधील पाणी प्यायला सुरूवात करण्याच्या तयारीत असतील. कारण फ्रिजमधील थंड पाण्यानं आराम मिळतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे फ्रिजमधील थंड पाणी पिऊन आत्मा आणि शरीर थंड करतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, उन्हाळ्यात फ्रिजमधील थंड पाणी पिणं म्हणजे तुम्ही तुमच्या आरोग्यासोबत खेळ करण्यासारखं आहे. अशात थंड पाणी पिण्यानं काय नुकसान होतात हे तुम्हाला माहीत असले पाहिजे.
पोट बिघडतं
थंड पाणी प्यायल्यामुळं पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जेव्हा तुम्ही उन्हातून घरात येता आणि लगेच थंड पाणी पिता तेव्हा आतड्या आकुंचन पावतात. अशात तुम्हाला पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि पचनासंबंधी समस्या होतात.
हार्ट रेट कमी होतो
सामान्यपणे गरमीच्या दिवसांमध्ये साध्या पाण्यानं तहान जात नाही. सतत थंड पाणी प्यावं वाटतं. मात्र, सतत थंड पाणी प्यायल्यानं हृदयाची गती कमी होते आणि यामुळे तुम्हाला हार्ट अटॅकही येऊ शकतो.
पचनक्रिया बिघडते
थंड पाणी हे पचनक्रिया बिघडवण्याचं काम करतं. काही खाल्ल्यावर थंड पाणी प्यायल्यावर पचनासाठी आवश्यक अग्नि विझते आणि त्यामुळे पचनक्रिया सुरळीत होत नाही. अशात पोटासंबंधी समस्याही होतात.
डोकं दुखतं
सतत थंड पाणी प्यायल्यानं ब्रेन फ्रीजची समस्याही होऊ शकते. थंड पाणी पिण्यावर करण्यात आलेल्या अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, थंड पाणी नसांमध्ये पोहोचलं की, मेंदुला एक संदेश देतं. ज्यामुळे डोकेदुखीची समस्या होऊ लागते.
कमजोरी आणि थकवा
थंड पाणी प्यायल्याने शरीराचं मेटाबॉलिज्म सिस्टीम स्लो होतं. ज्यामुळे शरीर फॅट योग्यपणे रिलीज करू शकत नाही. अनेक हे कमजोरी आणि थकव्याचं कारण ठरू शकतं.
कफ होतो
जेवण केल्यावर थंड पाणी प्यायल्यानं शरीरात कफ तयार होतो. जेव्हा शरीरात जास्त कफ तयार होतो तेव्हा तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. याच कारणानं सर्दी-खोकला वाढतो. त्यामुळे जेवण केल्यावर थंड पाणी पिऊ नका.