तुम्ही माऊथवॉश वापरता? वेळीच व्हा सावध!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 04:33 PM2018-04-30T16:33:39+5:302018-04-30T16:33:39+5:30
माऊथचा वापर करणे तुमच्यासाठी घातक ठरु शकतं. माऊथ वॉशमुळे तुमची शुगर लेव्हल वाढू शकते. याने तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
मुंबई : काय तुम्ही रोज माऊथ वॉशचा वापर करता? जर उत्तर होय असेल तर वेळीच सावध व्हा. कारण माऊथवॉशचा वापर करणे तुमच्यासाठी घातक ठरु शकतं. माऊथवॉशमुळे तुमची शुगर लेव्हल वाढू शकतं. याने तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकतं.
'हार्वर्ड युनिव्हर्सिटी' व्दारे करण्यात आलेल्या एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, रोज दिवसातून कमीत कमी दोनदा माऊथ वॉशचा वापर करणाऱ्या लोकांमध्ये इतर लोकांच्या तुलनेत डायबिटीजचा धोका 55 टक्के अधिक असतो.
'नायट्रिक ऑक्साईड जर्नल' मध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, माऊथवॉशमध्ये अॅंटी बॅक्टेरिअल इनग्रेडीएंट असतात. यामुळे तोंडात नायट्रिक अॅसिड तयार होण्यास अडचण येते. त्यामुळेच शरीरातील मेटॅबॉलिझम बिघडतं. (मेटॅबॉलिझम म्हणजे आपल्या शरीरातील अन्नाचे ऊर्जेत रुपांतर करण्याची प्रक्रिया). याच कारणाने डायबिटीजसारख्या गंभीर आजाराचा धोका वाढतो.
या संशोधनात जवळपास 1,206 वाढलेल्या वजनाने ग्रस्त व्यक्तींचा समावेस करण्यात आला होता. त्यांचं वय 40 ते 65 या दरम्यान होतं. यांना कोणत्याही प्रकारचा डायबिटीज आजार किंवा कोणताही हृदयाशी निगडीत आजार नव्हता.
यातून निष्कर्ष निघाला की, या लोकांमधील 43 टक्के लोक हे दिवसातून एकदा माऊथवॉशचा वापर करतात. तर 22 टक्के लोक दिवसातून 2 दोनदा माऊथवॉशचा वापर करतात. या सर्वच लोकांमध्ये ब्लड शुगरचा धोका अधिक आढळून आला.