काही केल्या बाहेर आलेलं पोट कमी होत नाहीये? रोज करून बघा हा खास उपाय...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 12:55 PM2024-06-14T12:55:18+5:302024-06-14T13:18:25+5:30
Ginger Water for Weight Loss : भारतीय घरांमध्ये आलं असतंच असतं. आल्याने सर्दी-खोकल्यासारख्या समस्या दूर करण्यास मदत मिळते.
Ginger Water for Weight Loss : लठ्ठपणा वाढण्याची समस्या आजकाल जास्तीत जास्त लोकांना होत आहे. लठ्ठपणा वाढला की, शरीरात अनेक आजार घर करतात. ज्यामुळे रोज काहीना काही समस्या होतात. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात त्यातील काही लोकांना फायदा होतो तर काही लोकांना होत नाही. अशात आज आम्ही तुम्हाला एक आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत. तो उपाय म्हणजे आल्याचं पाणी.
भारतीय घरांमध्ये आलं असतंच असतं. आल्याने सर्दी-खोकल्यासारख्या समस्या दूर करण्यास मदत मिळते. सोबतच याच्या नियमित सेवनाने शरीरातील चरबी कमी करण्यासही मदत मिळते. यासाठी एक खास ड्रिंक तयार करावं लागतं. त्याचे काय फायदे होतात तेच आज आपण जाणून घेऊ.
पोट फुगणं होईल बंद
नॅशनल इंस्टीटयूट ऑफ हेल्थमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, आल्याचं पाणी वजन कमी करण्यास फार मदत करतं. पण याचा प्रभाव तेव्हाच जास्त वाढेल जेव्हा यासोबत तुम्ही एक्सरसाइज कराल आणि पौष्टिक आहार घ्याल.
न्यूट्रिशन एक्सपर्ट डॉ. रचना श्रीवास्तव यांच्यानुसार, आल्यामध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट आणि अॅंटी-इन्फ्लामेटरी तत्व असतात. याने तुमची बद्धकोष्ठता आणि ब्लोटिंगची समस्या दूर होते. जर जास्त वजन वाढलेल्या व्यक्तीने याचं सेवन केलं तर या समस्या दूर होतात.
कसं प्याल आल्याचं पाणी
- एक ग्लास पाण्यात आल्याचे दोन ते तीन तुकडे टाकून उकडून घ्या. जेव्हा पाणी अर्ध शिल्लक राहिल तेव्हा ते गाळून घ्या.
- रात्री एक ग्लास पाण्यात आलं भिजवून ठेवा. हे पाणी सकाळी झोपेतून उठल्यावर पिऊ शकता.
- आजकाल बाजारात आल्याच्या पाण्याच्या बॉटल्स मिळतात. यात आल्याचा अर्क असतो. हा पाण्यात मिक्स करू सेवन करू शकता.
कसं आलं वापराल?
एक्सपर्टनुसार, आल्याचं पाणी बनवण्यासाठी फ्रेश आल्याचा वापर करावा. यात अॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर असतात. तसेच व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सही भरपूर असतात. वाळलेल्या आल्यात पोषक तत्व कमी होतात. त्यामुळे ताज्या आल्याचा वापर करणं कधीही योग्य.
कधी प्यावं हे पाणी?
आल्याचं पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यावं. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही दुपारी जेवणाच्या अर्ध्या तासानंतरही याचं सेवन करू शकता. जेवणानंतर आल्याचं कोमट पाणी प्यायल्याने पचन चांगलं होतं.
कुणी करू नये सेवन?
आल्याच्या पाण्याचे अनेक फायदे आहेत. पण काही लोकांनी याचं सेवन टाळलं पाहिजे. जसे की, हृदयरोग, डायबिटीस आणि गॉल स्टोन असलेल्या लोकांनी हे पाणी पिण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.