पायी चालण्याने वजन कमी कसं होतं आणि दिवसातून किती चालावं?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 03:25 PM2023-08-28T15:25:52+5:302023-08-28T15:26:20+5:30
Walking For Weight Loss: चालण्याने वजन कमी होतं म्हणून जास्तीत जास्त लोक सकाळी किंवा सायंकाळी चालतात. चालण्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.
Walking For Weight Loss: अलिकडे वजन वाढण्याची समस्या अनेकांना होते. लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. पण वजन करण्यासाठी अनेकजण सगळ्यात चांगला उपाय पायी चालणं सांगतात. वेगवेगळ्या रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, चालण्याने वजन कमी करण्यास मदत मिळते. पण पायी चालण्याने वजन कमी कसं होतं हे अनेकांना माहीत नसतं. तेच आज जाणून घेऊ...
चालण्याने वजन कमी होतं म्हणून जास्तीत जास्त लोक सकाळी किंवा सायंकाळी चालतात. चालण्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यातील एक महत्वाचा फायदा म्हणजे वजन कमी करणं. सोबतच वेगवेगळ्या आजारांपासूनही सुटका मिळते.
1) रोज किती चालावं?
तुम्ही किती पावलं चाललात हे तुम्ही एखाद्या अॅपच्या मदतीने ट्रॅक करू शकता. सुरूवातीला 15 हजार पावलं चालणं थोडं कठिण आहे. पण एकदा सवय झाली तर सोपं होतं. चालल्याने मांसपेशींमध्ये होणारी वेदनाही दूर होते. 15 हजार पावलं चालणं हा वजन कमी करण्यासाठी सर्वात चांगला उपाय आहे. 45 मिनिटांच्या एक्सरसाइजमध्ये तुम्ही 400 ते 500 कॅलरी बर्न करू शकता.
2) एका दिवसातून किती वेळ चालावं
एकाचवेळी जास्त वेळ चालण्याऐवजी तुम्ही चालण्याचा प्लान बनवू शकता. 20-20 मिनिटांचा कालावधीत तीन भागात डिव्हाइड करा. जेवणानंतर 15-20 मिनिटे चालावे. याने ब्लड शुगर कंट्रोल करण्यासही मदत मिळते. एकदाच 45 मिनिटे चालण्यापेक्षा तीन वेळा 20 मिनिटे चालणे जास्त सोपं आणि फायदेशीर ठरेल.
3) चालण्याआधी ग्रीन टी घेण्याचे फायदे
मेटाबॉलिज्म बूस्ट झाल्यास वजन कमी करण्यासाठी जास्त मदत होते. ग्रीन टी मेटाबॉलिज्मला बूस्ट करते. योग्य प्रमाणात कॅफीन आणि कॅटिसचं मिश्रण फॅट बर्न करण्याची प्रक्रिया वाढते.
4) भरपूर पाणी
योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने केल्याने वजन कमी होण्यास अधिक मदत मिळते. रोज 1.5 लिटरपेक्षा अधिक पाण्याचं सेवन केल्याने तुम्ही 17 हजार 400 कॅलरी एक वर्षात बर्न करू शकता.