व्यायामानं मीही पुरुषांसारखीच बलदंड होईन?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 03:03 PM2017-12-21T15:03:01+5:302017-12-21T15:04:10+5:30
..या भीतीनं बहुसंख्य महिला कार्डिओवर देतात भर आणि वेट ट्रेनिंगपासून राहतात दूर
- मयूर पठाडे
व्यायाम करायचा, एक्सरसाईज करायचा, असं अनेक महिलांना मनापासून वाटत असतं. कारण आपल्या शरीराविषयी, त्यातही आपल्या फिगरविषयी त्या सर्वाधिक जागरूक आणि बºयाचदा साशंकही असतात.
माझं वजन वाढतंय, फिगर पूर्वीसारखी राहिली नाही, चेहºयावर सुरकुत्या दिसायला लागल्यात.. ही कारणं त्यांना कायम सतावत असतात. त्यामुळे बहुतांश तरुणी, स्त्रिया व्यायामाला सुरुवात तर करतात, पण नेमका काय व्यायाम करायचा याविषयी त्या फार म्हणजे फारच साशंक असतात.
महिलांचा व्यायाम बहुदा कार्डिओ एक्सरसाईजापासून सुरू होतो आणि तिथेच संपतो. म्हणजे त्याव्यतिरिक्त फारसं काही करण्याच्या फंदात त्या पडत नाहीत.
उदाहरणार्थ मसल ट्रेनिंग..
मसल ट्रेनिंगचे व्यायाम केले, वजनं उचललेले म्हणजे आपण ‘पुरुषी’ होऊ, आपल्यातलं स्त्रित्व जाईल आणि पुरुषांसारके बलदंड होऊ, दिसू, आपले दंड, स्रायू पिळदार होतील, अशी एक अनामिक भीती त्यांच्या मनात दडलेली असते. त्यामुळे वजन उचलणं, मसल ट्रेनिंग वगैरेच्या भानगडीत त्या फारसं पडत नाहीत.
पण खरंतर मसल ट्रेनिंग हा प्रत्येकासाठीच आवश्यक भाग आहे. आणि आपलं शरीर पुरुषांसारखं दणकट होईल ही महिलांच्या मनातील भीती तर अगदीच निराधार आहे. महिलांचं शरीर पुरुषांसारखं दणकट होऊ शकत नाही, काण त्यांच्या शरीरात नैसर्गिकरित्याच तेवढं टेस्टोस्टेरॉन तयारच होत नाही, जेवढं पुरुषांच्या शरीरात होतं.
वेट ट्रेनिंगचा मुख्य फायदा म्हणजे त्यामुळे बोन डेनसिटी वाढते. ओस्टेओपोरॉसिससारख्या आजारांवर त्यामुळे नियंत्रण राखणं शक्य होतं. शरीरातील मस्क्युलर कोआॅर्डिनेशन वाढतं आणि इंन्ज्युरीचं प्रमाणही खूपच कमी होतं.
त्यामुळे महिलांनी कार्डिओबरोबरच वेट ट्रेनिंग, मसल ट्रेनिंगही केलं पाहिजे. त्यांच्या आरोग्यासाठी त्याचा निश्चितच अधिक फायदा होतो.