​आता होईल गोड खाण्याची इच्छा कमी...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2016 09:58 AM2016-07-03T09:58:14+5:302016-07-03T15:28:14+5:30

एक विशिष्ट प्रकारचा बॅक्टेरिआ गोड आणि कॅलरीयुक्त पदार्थ खाण्याच्या आपल्या इच्छेवर नियंत्रण ठेवतो.

Will now be less willing to eat sweet ... | ​आता होईल गोड खाण्याची इच्छा कमी...

​आता होईल गोड खाण्याची इच्छा कमी...

Next
ड खायला कोणाला आवडत नाही? समोर चॉकलेट, केक, आईसक्रीम पाहून प्रत्येकाचीच जीभ चळवळायला लागते. पण शरीरात साखरेचे प्रमाण वाढणे म्हणजे विविध आजारांना खुले निमंत्रण.

हे सर्व माहित असून गोड खाण्याचा मोह आवरणे कठिण असते. यावर उपाय म्हणून वैज्ञानिकांना आपल्या पोटात तयार होणारा एक विशिष्ट प्रकारचा बॅक्टेरिआ शोधून काढण्यात यश आले जो गोड आणि कॅलरीयुक्त पदार्थ खाण्याच्या आपल्या इच्छेवर नियंत्रण ठेवतो.

इम्पेरिअल कॉलेज लंडन आणि ग्लास्गोव्ह विद्यापीठातील संशोधकांनी वीस स्वयंसेवकांना मिल्कशेक पिण्यासाठी दिले. यांपैकी काही मिल्केशकमध्ये इन्युलिन-प्रोपायोनेट मिसळलेले होते. पिल्यानंतर सर्वांचे ‘एमआरय’ स्कॅन करत असताना त्यांना सलाद, मासे, विविध भाज्या, चॉकलेट, केक आणि पिझ्झासारखे काही कमी तर काही जास्त कॅलरीयुक्त पदार्थांचे फोटो दाखवण्यात आले.

यावेळी असे दिसून आले की, इन्युलिन-प्रोपायोनेट असलेले मिल्कशेक पिलेल्या लोकांच्या मेंदूमधील  कौडेट आणि न्युक्ल्युएस अक्क्युम्बेन्स भागात फार कमी अ‍ॅक्टिव्हिटी होती. खाण्याची इच्छा उत्पन्न करणारा हा भाग असतो. फोटोपाहून खाण्याची इच्छा किती तीव्र होती असे विचारले असता त्यांनी अधिक कॅलरीयुक्त पदार्थांना सर्वात कमी पसंती दिली.

वरिष्ठ संशोधक गॅरी फ्रॉस्ट यांनी माहिती दिली की, या अध्ययनातून हे स्पष्ट होते की, विशिष्ट प्रकारचे बॅक्टेरिआ सपलमेंट वापरून आपण गोड व कॅलरीयुक्त पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण कमी करू शकतो, जे की आरोग्यासाठी खूप लाभदायक ठरेल.

Web Title: Will now be less willing to eat sweet ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.