Health Insurance Omicron: तुमच्या आरोग्य विम्यातून ओमायक्रॉनवर उपचार होणार की नाहीत? IRDAI ने दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 11:53 AM2022-01-04T11:53:08+5:302022-01-04T11:53:33+5:30
Health Insurance cover Omicron: ओमायक्रॉनमुळे रुग्ण गंभीर होत नसला तरी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागत आहे. यामुळे ओमायक्रॉनची लागण झाली तर तुम्हाला तुमची विमा कंपनी आरोग्य विम्याचे पैसे देणार की नाही, याबाबत आता इरडाने माहिती दिली आहे.
देशात कोरोना व्हायरस पुन्हा वेगाने वाढू लागला आहे. ओमायक्रॉनचे रुग्ण एवढे वाढत नसले तरी देखील डेल्टाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. ओमायक्रॉनमुळे रुग्ण गंभीर होत नसला तरी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागत आहे. यामुळे ओमायक्रॉनची लागण झाली तर तुम्हाला तुमची विमा कंपनी आरोग्य विम्याचे पैसे देणार की नाही, याबाबत आता इरडाने माहिती दिली आहे.
ज्या लोकांनी आरोग्य विमा पॉलिसीमध्ये कोरोना उपचाराच्या पॉलिसी काढल्या आहेत, त्यांना ओमायक्रॉनची लागण झाली तरी उपचाराचा खर्च विम्यातून कव्हर केला जाणार आहे. इरडाने यासंबंधीचे आदेश विमा कंपन्यांना दिले आहेत. सर्व सामान्य आणि आरोग्य विमा कंपन्यांनी ज्या विमाधारकांना कोरोनाच्या उपचाराच्या पॉलिसी दिल्या आहेत, त्यांना ओमायक्रॉन उपचारावर विमा संरक्षण द्यावे, असे म्हटले आहे. कोरोना रुग्ण वाढत असल्याने इरडाने हे निर्देश जारी केले आहेत.
इरडाने एप्रिल २०२० मध्ये इरडाने आरोग्य विमा जो पॉलिसीधारक ह़ॉस्पिटलमध्ये गेल्यावर त्याचा खर्च देतो, त्या सर्व पॉलिसीमध्ये कोरोनाचे उपचारही कव्हर करावेत असे म्हटले होते. सुरुवातीला अनेक कंपन्या कोरोनावरील उपचार त्यांच्या विमा पॉलिसीमध्ये बसत नसल्याचे कारण देत खर्च देणे फेटाळत होत्या. आता इरडामुळे निम्मा खर्च जो कंझ्युमेबलमध्ये येत नाही तो देत आहेत.