व्यायाम कराल कि डाएटवर कंट्रोल ठेवाल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 05:36 PM2017-09-20T17:36:51+5:302017-09-20T17:37:55+5:30

वजन कमी करण्यासाठी यातली एक तरी गोष्ट निवडावीच लागेल..

Will you exercise or diet? | व्यायाम कराल कि डाएटवर कंट्रोल ठेवाल?

व्यायाम कराल कि डाएटवर कंट्रोल ठेवाल?

Next
ठळक मुद्देवजन कमी करण्याचे दोन मुख्य मार्ग. पहिला मार्ग म्हणजे व्यायाम करायचा आणि दुसरा मार्ग म्हणजे डाएट कंट्रोल करायचा.‘व्यायाम आपल्यानं बापजन्मात होणार नाही’, अशी तुमची भूमिका असेल तर मग त्याच्यापाठी धावूही नका. त्यापेक्षा सरळ डाएटचा मार्ग पकडा.‘अमूक एक खाणंपिणं सोडणं मला या आयुष्यात जमायचं नाही’, असं जर तुमचं म्हणणं असेल तर डाएटच्या फारशा फंदात पडू नका.आपल्या ध्येयापासून आपण ढळणार नाही, ध्येयासाठी आपल्याला प्रोत्साहन मिळत राहील अशा गोष्टींचा शोध घ्या..

- मयूर पठाडे

वजन कमी करायचंय.. म्हटलं, तर ही फार मोठी गोष्ट आहे आणि म्हटलं तर अतिशय सोपी. आजपर्यंत हजारो, लाखो लोकांनी आजवर वजन कमी करण्याची प्रतिज्ञा केलीय, पण त्यापैकी फारच थोड्या लोकांना आपलं उद्दिष्ट पूर्ण करता आलंय, पण त्याचवेळी असेही हजारो, लाखो लोक आहेत, ज्यांनी वजनाला आपल्या मुठीत ठेवण्याचं आपलं उद्दिष्ट अगदी सहजपणे पूर्ण केलंय. त्यासाठीचे त्यांचे उपाय मात्र हटके होते आणि त्याला ते चिटकूनही राहिले.
तुम्हालाही तुमचं वजन कमी करायचं असेल, तर फार अवघड नाही ते. योग्य मार्ग मात्र त्यासाठी वापरले पाहिजेत.

काय कराल?
१- वजन कमी करण्याचे दोन मुख्य मार्ग. पहिला मार्ग म्हणजे व्यायाम करायचा आणि दुसरा मार्ग म्हणजे डाएट कंट्रोल करायचा. अरबट चरबट काहीही खायचं नाही.
२- वजन कमी करायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही कोणत्या प्रकारचे व्यक्ती आहात ते अगोदर तपासून पाहा. म्हणजे ‘व्यायाम आपल्यानं बापजन्मात होणार नाही’, अशी तुमची भूमिका असेल तर मग त्याच्यापाठी धावूही नका. त्यापेक्षा सरळ डाएटचा मार्ग पकडा.
३- पण जर ‘अमूक एक खाणंपिणं सोडणं मला या आयुष्यात जमायचं नाही, त्यापेक्षा काय व्यायाम करायचा असेल तो सांगा’, असं जर तुमचं म्हणणं असेल तर डाएटच्या फारशा फंदात पडू नका.
४- आपण कोणत्या प्रकारचे व्यक्ती आहोत हे एकदा कळल्यानंतर आपल्या ध्येयापासून आपण ढळणार नाही, ध्येयासाठी आपल्याला प्रोत्साहन मिळत राहील अशा गोष्टींचा शोध घ्या.. मग ते तुमचे मित्र असतील किंवा फॅमिली मेंबर किंवा आणखी कुणी..
५- नेहेमी पॉझिटिव्ह विचार करा. म्हणजे काहीही झालं तरी मला ते जमेलच, यावर विश्वास ठेवा. त्याबरोबर शिस्त, पेशन्स आणि कठोर परिश्रम.. या गोष्टी असल्यात तर यश तुमच्या खिशात आहे समजा.
६- तुम्ही कोणत्याही प्रकारचे व्यक्ती असलात, तरी काकडी आणि लिंबूवर्गीय फळं तर तुम्ही खाऊच शकता. तुम्हाला ते वजनाच्या काट्याबाहेर फारसं जाऊ देणार नाही!

Web Title: Will you exercise or diet?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.