​हिवाळ्यात बॉडी केअर प्रॉडक्ट्स घेताय?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2016 05:25 PM2016-12-01T17:25:04+5:302016-12-01T17:25:04+5:30

हिवाळा ऋतू तसा आरोग्यदायी मानला जातो. या काळातील गुलाबी थंडीचा आनंद सर्वचजण घेतात. मात्र याच दरम्यान आजारी पडण्याचाही धोका तेवढाच असतो

Winter body care products? | ​हिवाळ्यात बॉडी केअर प्रॉडक्ट्स घेताय?

​हिवाळ्यात बॉडी केअर प्रॉडक्ट्स घेताय?

Next
ong>-Ravindra More

हिवाळा ऋतू तसा आरोग्यदायी मानला जातो. या काळातील गुलाबी थंडीचा आनंद सर्वचजण घेतात. मात्र याच दरम्यान आजारी पडण्याचाही धोका तेवढाच असतो. त्यामुळे थंडीत आरोग्याची काळजी घेण्याची गरज असते. सर्वात महत्त्वाचे असते त्वचेची काळजी घेणे. कारण हिवाळ्यात थंडीमुळे त्वचा कोरडी पडते. रुक्ष त्वचेला मुलायम बनविण्यासाठी आपण मार्केटमधून विविध प्रकारचे बॉडी केअर प्रॉडक्ट्स खरेदीही करतो. मात्र बºयाचदा आपणास त्या प्रॉडक्ट्स बाबत योग्य माहिती नसल्यामुळे फायद्या ऐवजी नुकसानच जास्त होते. आजच्या सदरात बॉडी केअर प्रॉडक्ट्स खरेदी करताना काय काळजी घ्यावी याबाबत जाणून घेऊया...



बॉडी लोशन - 
बहुतेकजण हिवाळ्यात कोरडी त्वचा मुलायम होण्यासाठी बॉडी लोशनचा वापर करतात. मात्र बॉडी लोशन आपल्या स्कीन टाईपनुसारच खरेदी करावी. याबाबतची माहिती उत्पादनाच्या लेबलवर दिलेली असते. त्याच बरोबर बॉडी लोशन मधील आवश्यक बाष्पशील तेल, वनस्पती अर्क, ईमोलेन्ट याची माहिती करुन घ्यावी. बॉडी लोशन्समध्ये त्याच्या फ्रेग्रन्स आणि त्वचेमध्ये ओलावा निर्माण करण्यासाठी आवश्यक बाष्प तेल वापरले जाते.    



साबण-  
साबणात असलेल्या कंटेंटबाबत अधिक माहिती नसल्याने तसा साबण वापरल्याने बºयाचदा थंडीमध्ये आपली त्वचा कोरडी पडते. यासाठी साबणाची निवड करताना त्याच्या कंटेंटमध्ये ‘टीएफएम’ किती आहे याची माहिती करुन घ्या. टीएफएम म्हणजे ‘टोटल फॅटी मटेरियल’. साबणात टीएफएम जेवढे जास्त तेवढा त्यात आॅईल कंटेंट जास्त.  असा साबण वापरल्याने तुमची त्वचा कोरडी पडणार नाही. असे साबणही दोन प्रकारचे असतात. साबणातला फॅट कंटेंट हा प्राणिज किंवा वनस्पतीजन्य असतो. विशेषत: ज्यांना अ‍ॅलर्जीचा  त्रास आहे त्यांनी प्राणीज चरबीपासून बनवलेले साबण, क्रीम किंवा बॉडीलोशन वापरू नये. खाद्यपदार्थांवर लाल किंवा हिरवा रंगाच्या मार्कवरुन त्यातील फॅट वनस्पती किंवा प्राणीज आहेत हे आपणास समजू शकते. मात्र स्कीन केअर प्रॉडक्ट्समध्ये असे निशाण नसते. म्हणून आपल्या आवडीनुसार व शरीर प्रकृतीनुसार योग्य उत्पादनाची निवड पूर्ण लेबल वाचून किंवा बघूनच करावी. तसेच साबण खरेदी करताना चांगल्या कंपनीचा आहे की नाही याचीही खात्री करुन घ्यावी. 



फेसवॉश- 
हिवाळ्यात बहुतांश फेसवॉशची निवड त्याच्या ब्रँडनुसार केली जाते. मात्र बºयाचदा चांगल्या ब्रँडचे फेसवॉश वापरुनही त्याचे प्रभावी परिणाम मिळत नाहीत. यासाठी आपली त्वचा कोणत्या प्रकारची आहे हे ओळखूनच फेसवॉशची निवड करावी. कारण, प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी फेसवॉशची वेगळी उत्पादने तयार केली जातात. बहुतांश फेसवॉशमध्ये तेलाचा वापर केला जातो. किंवा कोरड्या त्वचेसाठी क्रिमी फेसवॉश देखील बाजारात उपलब्ध आहेत. थंडीसाठी असे फेसवॉश निवडणे चांगले.



लिपबाम - 
हिवाळ्यात हवेतील गारव्याचा त्वचेशी संपर्क आल्याने त्वचा कोरडी पडते. यामुळे बाहेर पडताना लीप लोशन किंवा लीप बाम त्वचेला लावणे गरजेचे आहे. सध्या लीप बाम्समध्ये विविध फ्लेवर्स उपलब्ध आहेत. लिपस्टिकचा वापर करत असाल तर लीप प्रोटेक्टर म्हणूनही लिपबामचा उपयोग होतो.  कलर लिपबामचा वापर केल्यास लिपस्टिक वापरण्याची गरज नाही.

Web Title: Winter body care products?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.