हिवाळ्यात जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ केल्याने होतात हे नुकसान, वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 05:58 PM2023-11-08T17:58:18+5:302023-11-08T17:59:14+5:30

Winter Health Tips : हिवाळ्यात जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ करत असाल तर तुम्हाला याने वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

Winter Care Tips : Disadvantage of bathing hot water too long in Winter | हिवाळ्यात जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ केल्याने होतात हे नुकसान, वेळीच व्हा सावध!

हिवाळ्यात जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ केल्याने होतात हे नुकसान, वेळीच व्हा सावध!

Winter Health Tips :  अर्थातच हिवाळ्यात जवळपास सगळेच गरम पाण्याने आंघोळ करतात. कारण थंड पाण्याला हात लावायची देखील कुणाची हिंमत होत नाही. गरम पाण्याने शरीराला गरमी तर मिळतेच सोबतच आरामही मिळतो. मात्र, जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ करत असाल तर तुम्हाला याने वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

त्वचेला इजा

गरम पाणी शरीरावर असलेल्या मॉइश्चरायजरला सहजपणे दूर करतं. पण जास्त वेळ गरम पाण्यात राहिलं किंवा अंगावर घेतलं तर स्किनवरील नॅच्युरल मॉइश्चर कमी होऊन स्किनचं नुकसान होतं. जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्यास स्किन ड्राय होते आणि स्किनवर क्रॅक्स येऊ लागतात. हे भलेही दिसत नसतील पण याने रॅशेज आणि इचिंगची समस्या निर्माण होऊ शकते. असं झाल्यास डॉक्टरांना भेटल्याशिवाय पर्याय नसतो.

इन्फेक्शन

हिवाळ्यात साधारणपणे स्किन उलण्याची समस्या अधिक होते. त्यामुळे वातावरणातील बॅक्टेरिया सहजपणे स्किनमध्ये प्रवेश करतात. याने इन्फेक्शनचा धोका अधिक वाढतो. 

फर्टिलिटीवर प्रभाव

एका रिसर्चनुसार जर व्यक्ती ३० मिनटांपेक्षा अधिक वेळ गरम पाण्यात राहत असेल तर त्याच्या प्रजनन क्षमतेवर याचा प्रभाव पडतो. जास्त गरम पाण्यामुळे शुक्राणूं कमजोर होतात किंवा त्यांच्या निर्मितीवर परिणाम होतो.

सुरकुत्या येतात

गरम पाण्याने भलेही तुम्ही चेहरा धुवत नसाल पण पाण्याची वाफ चेहऱ्यावर येतेच. यामुळे स्किनचे पोर्स मोठे होतात. सोबतच स्किनचं मॉइश्चर डॅमेज होऊन सुरकुत्या येऊ शकतात.

केसगळती

गरम पाण्याने केस आणि डोक्याची स्किन ड्राय होते. यामुळे केस सहज तुटू लागतात. याने केसगळी वाढून डोक्यात खासही येऊ शकते. त्यामुळे तुम्हाला टक्कल पडणं टाळायचं असेल तर जास्त गरम पाण्याने केस धुवू नका किंवा आंघोळ करू नका.

गरम पाण्याने किती वेळ आंघोळ करावी?

एका रिसर्चनुसार, गरम पाण्याने 10 ते 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ आंघोळ करू नये. तसेच आंघोळीनंतर शरीरावर मॉइश्चर लावणं गरजेचं ठरतं. जेणेकरून स्कीन ड्राय होऊ नये आणि इतरही काही समस्या होऊ नये.

Web Title: Winter Care Tips : Disadvantage of bathing hot water too long in Winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.