हिवाळ्यात रात्री सॉक्स घालून झोपल्याने होतात या गंभीर समस्या, जाणून घ्या नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 01:36 PM2023-12-22T13:36:42+5:302023-12-22T13:38:37+5:30
Winter Care Tips : काही लोक रात्री पायात सॉक्स घालून झोपतात. पण अनेकांना याचे नुकसान माहीत नसतात. जर हे माहिती नसेल तर तुम्हाला चांगलं महागात पडेल.
Winter Care Tips : सध्या थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत असतात. बरेच लोक थंडीपासून वाचण्यासाठी स्वेटरचा, टोपीचा वापर करतात. तर काही लोक रात्री पायात सॉक्स घालून झोपतात. पण अनेकांना याचे नुकसान माहीत नसतात. जर हे माहिती नसेल तर तुम्हाला चांगलं महागात पडेल.
ब्लड सर्कुलेशनची समस्या
शरीराला जास्त थंडी लागू नये म्हणून बरेच लोक रात्री सॉक्स घालून झोपतात. पण यामुळे तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. असं केल्याने शरीरात ब्लड सर्कुलेशनची समस्या होऊ शकते.
ओव्हर हीटिंगची समस्या
जर तुम्ही रात्री सॉक्स घालून झोपत असाल तर तुम्हाला ओव्हर हीटिंगची समस्या जास्त होऊ शकते. यामुळे शरीराचं तापमान अचानक खूप जास्त वाढतं. तुम्हाला अस्वस्थता वाटू शकते.
झोप न येण्याची समस्या
जर तुम्ही झोपताना टाइट सॉक्स घालून झोपत असाल तर तुम्हाला चांगली झोप न येण्याची समस्या होऊ शकते. त्यामुळे कधीही रात्री सॉक्स घालून झोपू नये.
हृदयासंबंधी समस्या
रात्रभर सॉक्स घालून झोपले तर शरीरात व्यवस्थित ब्लड सर्कुलेशन होत नाही. यामुळे तुम्हाला हृदयासंबंधीही समस्या होऊ शकतात. सॉक्समुळे पायांच्या नसांवर दबाव पडू शकतो.
त्वचेवर एलर्जी
रोज रात्री सॉक्स घालून झोपल्याने त्वचेसंबंधी समस्या होऊ शकतात. तुम्हाला एलर्जीची समस्याही होऊ शकते. ज्यामुळे इतरही गंभीर समस्या होतात.