हिवाळ्यात भुईमुगाच्या शेंगा खाण्याचे फायदे, अनेक समस्या होतील दूर...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 11:18 AM2023-11-08T11:18:27+5:302023-11-08T11:18:56+5:30

खासकरुन ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी तर आवर्जून भुईमूगाच्या उकडलेल्या शेंगा खायला हव्यात.

Winter Care Tips : Know the boiled peanuts health benefits | हिवाळ्यात भुईमुगाच्या शेंगा खाण्याचे फायदे, अनेक समस्या होतील दूर...

हिवाळ्यात भुईमुगाच्या शेंगा खाण्याचे फायदे, अनेक समस्या होतील दूर...

हिवाळा सुरू झाला की, अनेक फळं खाण्याची वेगळीच मजा असते. याच दिवसात भुईमुगाच्या शेंगाही खाण्याची चंगळ असते. या शेंगा या दिवसात आरोग्यासाठीही फार महत्वाच्या ठरतात. यातून अनेक पौष्टिक तत्व शरीराला मिळतात. भूईमुगाच्या उकडलेल्या शेंगा या दिवसात खास पसंत केल्या जातात. ज्यांचे अनेक फायदे मिळतात. खासकरुन ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी तर आवर्जून भुईमूगाच्या उकडलेल्या शेंगा खायला हव्यात.

अमेरिकन केमिकल सोसायटी द्वारे यावरक रिसर्च करण्यात आला. या रिसर्चमधून असं समोर आलं की, भाजून किंवा तळून भुईमूगाच्या शेंगा खाण्याऐवजी त्या उलडून खाल्ल्यास त्यात असलेल्या पोषक तत्त्वांचा फायदा चार पटीने जास्त होतो. त्यासोबतच या शेंगा उकडल्यावर त्यातील अॅंटी-ऑक्सिडेंटचं प्रमाणही वाढतं. चला जाणून घेऊ उकडलेल्या भुईमूगाच्या शेंगा खाण्याचे फायदे.

वजन कमी होतं

भुईमूगाच्या शेंगा खाल्ल्याने शरीराला त्वरीत ऊर्जा मिळते. यात फॅट कमी असते, त्यामुळे या शेंगा खाल्ल्याने वजन वाढण्याची भीती राहत नाही. तसेच यात कॅलरीही कमी असतात, अशात जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर उकडलेल्या भुईमूगाच्या शेंगांचा आहारात आवर्जून समावेश करा.

कमी होते चरबी

उकडलेल्या भुईमूगाच्या शेंगांमध्ये भाजलेल्या किंवा तेलात तळलेल्या शेंगांपेक्षा अधिक फायबर असतं. जास्त फायबर असलेला आहार घेतल्याने खाल्लेलं अन्न चांगल्याप्रकारे पचन होण्यास मदत होते. त्यासोबतच मेटाबॉलिज्म मजबूत होतं. ज्यामुळे शरीरात जमा झालेली एक्स्ट्रा चरबी वेगाने बर्न होते. 

डोळ्यांसाठी फायदेशीर

भुईमूगाच्या शेंगांमध्ये व्हिटॅमिन बी६ आणि व्हिटॅमिन ए असतात. त्यामुळे जर हिवाळ्यात सकाळी उकडलेल्या भुईमूगाच्या शेंगांमध्ये किशमिश मिश्रित करुन खावे. याने डोळ्यांची दृष्टी वाढते.

हृदयरोगांपासून बचाव

भुईमूगाच्या शेंगांमध्ये पॉलीफेनॉलिक अॅंटी-ऑक्सिडेंट आणि रेल्वेराट्रॉल असतात. अशात भुईमूगाच्या शेंगा खाल्ल्याने हृदयरोग, कॅन्सर असे आजार आणि वेगवेगळ्या इन्फेक्शनपासून बचाव होतो. त्यासोबतच या तत्वांमुळे शरीरात नायट्रिक ऑक्साइड जास्त तयार होऊ लागतो. त्यामुळे या शेंगा खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी असते. 

शेंगदाणे खाण्याचे फायदे

शेंगदाणे हे प्रोटीनचे मोठा स्रोत आहेत १०० ग्राम शेंगदाण्याच्या १ लिटर दुधाइतके प्रोटीन असतात. शेंगदाण्यात अमिनो अम्ल असतात जे वाढीसाठी आणि विकासासाठी उपयोगी ठरतात. शेंगदाण्याचा सेवनाने पोटाचे आजार टळतात. शेंगदाण्याच्या पॉली फेनॉलिक अँटी ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात तसेच शेंगादाण्यातील काही ठराविक घटकांमुळे पोटाचा कॅन्सरला प्रतिबंध होतो.

शेंगादाण्यामध्ये जीवनसत्व व्हिटॅमिन बी आढळते जे शरीराला आवश्यक असते. त्यामुळे मेंदूचे आरोग्य व्यवस्थित राहते आणि मेंदूला जाणारा रक्तप्रवाह योग्य राहतो. तसेच शेंगादाण्यामध्ये व्हिटॅमिन ई आढळते व्हिटॅमिन ई शरीरातील शरीरातील पेशींचे आवरण आणि त्वचा यांचे संरक्षण करते.

Web Title: Winter Care Tips : Know the boiled peanuts health benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.