थंडी वाढल्याने, मुलांमध्ये वाढतोय न्यूमोनियाचा धोका; अशी घ्या काळजी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 12:27 PM2024-01-24T12:27:31+5:302024-01-24T12:29:50+5:30
गेल्या काही दिवसात राज्यात थंडीने सोबत काही आजारही आणले आहेत.
Health Tips : गेल्या काही दिवसात राज्यात थंडीने सोबत काही आजारही आणले आहेत. त्यामुळे सर्दी, खोकल्याचा रुग्ण आढळत आहे. काहींचा विकार इतका बळावतो की त्यांना ब्रॉन्कायटिस आणि न्यूमोनियासारखे आजार होऊन रुग्णालयात दाखल करावे लागते. त्यामुळे या काळात लहान मुलांची विशेष काळजी घेतली पाहिजे, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
नागरिकांचे पावसाळा, उन्हाळा या मोसमात प्रचंड हाल हाेतात. त्यामुळे कधी ती एकदाची थंडी पडतेय याची वाट पाहत असतात. मात्र बालकांना या थंडीच्या काळात विशेष करून श्वसनविकाराच्या व्याधीला सामोरे जावे लागते. काहींचा विकार इतका बळावतो की त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागते.
मुले चिडचिडी होतात :
लहान मुलांचा हा त्रास काही दिवस राहिल्यास खोकून खोकून घसा लाल होतो. त्यामुळे या आजारावरील उपचाराकरिता डॉक्टरकडे जावे लागते. काही जणांना याचा त्रास अधिक जाणवून ताप येत असतो.
सुरुवातीच्या काळात वाटणारा खोकला आणि सर्दी ही सर्वसामान्य लक्षणे वाटत असली तरी त्याच्यावर वेळीच उपचार नाही केल्यास तो त्रास वाढण्याची शक्यता अधिक आहे.
या काळात मुले चिडचिडी होतात, खाण्यास टाळाटाळ करतात.
थंड हवा टाळण्यासाठी लहान मुलांचे कान, छाती आणि तळव्यांची काळजी घेतली पाहिजे. त्यांना शक्यतो गरम कपडे वापरण्यास सांगितले पाहिजे. तसेच त्यांना कोमट पाणी पिण्यासाठी दिले पाहिजे. त्यांना या काळात थंड पदार्थ देऊन नयेत. या थंडीमुळे त्यांना सर्दी-पडसे, खोकला असे आजार होतात. मात्र काही वेळेस हा आजार बळावण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे त्यांना त्यांना ब्रॉन्कायटिस, न्यूमोनियासारखे आजार होऊ शकतात. - डॉ. उपेंद्र किंजवडेकर, अध्यक्ष, अखिल भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटना
थंडी वाढल्याने, मुलांमध्ये वाढतोय न्यूमोनियाचा धोका; अशी घ्या काळजी - बातमीसाठी फिचर फोटो पाहिजे.