हिवाळ्यात ड्राय स्कीन होऊ नये म्हणून कोणत्या तेलांचा वापर करावा?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 03:41 PM2023-10-27T15:41:54+5:302023-10-27T15:44:54+5:30

Skin Care Tips : तुम्ही काही ऑर्गॅनिक तेलांचा वापर करून त्वचा मुलायम आणि हेल्दी ठेवू शकता.

Winter special: Five best body oils for dry skin! | हिवाळ्यात ड्राय स्कीन होऊ नये म्हणून कोणत्या तेलांचा वापर करावा?

हिवाळ्यात ड्राय स्कीन होऊ नये म्हणून कोणत्या तेलांचा वापर करावा?

हिवाळा सुरू होताच अनेकांची त्वचा ड्राय होऊ लागते. कितीही क्रीम, लोशन, मॉइश्चरायजर लावा काही फरक बघायला मिळत नाही. या दिवसात त्वचेतील ओलावा कमी झाल्याने त्वचा ड्राय होऊ लागते. अनेक लोक हिवाळ्यात पाण्याचं कमी सेवन करतात, याने शरीर डिहायड्रेट होऊ लागतं. जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता होते, तेव्हा अर्थात त्वचा ड्राय होऊ लागते. यामुळे त्वचा रखरखीत होऊ लागते. अशात तुम्ही काही ऑर्गॅनिक तेलांचा वापर करून त्वचा मुलायम आणि हेल्दी ठेवू शकता.

खोबऱ्याचं तेल

खोबऱ्याच्या तेलाचा वापर वर्षानुवर्षे  केसांची मजबूती वाढवण्यासाठी केला जातोय. हे तेल त्वचेसाठीही फायदेशीर ठरतं. यातील पोषक तत्वामुळे त्वचेतून दूर झालेला ओलावा परत मिळवण्यास मदत मिळते. हे तेल रात्री चेहऱ्यावर लावल्याने त्वचा मुलायम आणि हेल्दी होते. या तेलात फॅटी अ‍ॅसिड असतं, जे त्वचेचा इन्फेक्शनपासून बचाव करतं. तसेच याने कमी वयात त्वचेवर सुरकुत्याही येत नाहीत. 

ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई आणि पॉलीफेनॉल्स असतात, जे सुरकुत्या होऊ देत नाहीत. व्हिटॅमिन ई त्वचेला मुलायम ठेवतं आणि त्वचेची प्रखर सूर्यकिरणांपासून रक्षाही करतं. ऑलिव्ह ऑइलमुळे त्वचेची बंद झालेली रोमछिद्रे मोकळी होतात. अशात पिंपल्स झाले असतील तर हे तेल नक्की लावा. हे तेल रात्री झोपताना लावावं. 

बदाम तेल

बदामाच्या तेलाचेही अनेक फायदे होतात. बदामाच्या तेलाचं सेवन करून हार्ट हेल्दी राहतं. हेल्दी हार्टसोबतच निरोगी त्वचेसाठीही हे तेल फायदेशीर मानलं जातं. यात व्हिटॅमिन ई, फॅटी अ‍ॅसिड, प्रोटीन, झिंक इत्यादी असतात. जे त्वचा निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. हे तेल सहजपणे त्वचेमध्ये सामावतं. 

Web Title: Winter special: Five best body oils for dry skin!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.