दाढेचं दुखणं दूर करण्याचे काही खास घरगुती उपाय, जाणून घ्या कसा कराल वापर!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 04:11 PM2024-08-08T16:11:46+5:302024-08-08T16:12:36+5:30
Wisdom tooth pain home remedies: तुम्हीही दाढेच्या दुखण्याने हैराण झाले असाल तर ही समस्या तुम्ही घरच्या घरी सोप्या उपायांनी दूर करू शकता.
Wisdom tooth pain home remedies: दाढ दुखण्याची समस्या अनेकांना होत असते. वाढत्या वयात ही समस्या जास्तीत जास्त लोकांना होते. कारण जसजसं वय वाढत जातं दाढ बाहेर येऊ लागते. बरेच लोक असे असतात ज्यांना त्यांची दाढ खूप जास्त त्रास देते. दाढेचं दुखणं इतकं वाईट असतं की, कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. दाढ बाहेर येत असल्याने हिरड्या पसरतात, दातांना किड लागते आणि तीव्र वेदना होतात. अशात जर तुम्हीही दाढेच्या दुखण्याने हैराण झाले असाल तर ही समस्या तुम्ही घरच्या घरी सोप्या उपायांनी दूर करू शकता. हे उपाय काय आहेत तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
गरम पाण्याने गुरळा करा
दाढ दुखत असेल तर दाढेला आणि हिरड्यांना आराम देण्यासाठी मिठाच्या पाण्याचा गुरळा करता येऊ शकतो. एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा मीठ टाका. हे पाणी तोंडात ठेवून फिरवा. वेदना कमी होण्यास आणि दात साफ होण्यास याने मदत मिळेल.
लवंग तेल
दाढीचं दुखणं दूर करण्यासाठी तुम्ही लवंग तेलाचा वापर करू शकता. या तेलामध्ये यूजीनोल नावाचं तत्व असतं. हे एनेस्थेटिकसारखं काम करतं. जे अॅंटी-बॅक्टेरिअल तत्व आहे. तसेच या तेलामध्ये अॅंटी-इन्फ्लेमेटरी आणि अॅंटी-फंगल गुणही असतात. हे तेल रूईच्या मदतीने दाढेवर लावून ठेवा. याने वेदना कमी होण्यास मदत मिळेल.
काकडी
दाढ दुखत असेल तर काकडीचा तुकडा वेदना कमी करण्यास फायदेशीर ठरतो. काकडीचा तुकडा दाढेवर ठेवा. काकडीने वेदना कमी होण्यास मदत मिळते. तसेच दाढेला थंडावाही मिळतो. तसेच काकडीचा रस रूईच्या मदतीनेही दाढेवर लावू शकता.
पदीना
पदीन्याची ताजी पाने किंवा वाळलेली पाने ही समस्या दूर करण्यास मदत करू शकतात. पदीना दाढेचं दुखणं कमी करण्यास मदत करतो. याने तोंडातील बॅक्टेरिया दूर होण्यास मदत मिळते आणि इन्फेक्शनपासूनही बचाव होतो. यासाठी पदीन्याची पाने दाढेवर २० मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर काढून टाका. याने तुम्हाला आराम मिळेल.