काही लोकांसाठी खूप फायदेशीर ठरते बदामाची साल, एक्सपर्टने सांगितली खाण्याची योग्य पद्धत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 15:08 IST2024-12-16T15:07:43+5:302024-12-16T15:08:16+5:30

अनेक लोक रात्री बदाम भिजवून ठेवून सकाळी खातात आणि यावेळी बदामाची साल काढून फेकतात. पण ही एक मोठी चूक असल्याचा दावा करण्यात आला आहे.

With or without peel expert told the best way to eat almond | काही लोकांसाठी खूप फायदेशीर ठरते बदामाची साल, एक्सपर्टने सांगितली खाण्याची योग्य पद्धत!

काही लोकांसाठी खूप फायदेशीर ठरते बदामाची साल, एक्सपर्टने सांगितली खाण्याची योग्य पद्धत!

बदामाला ड्राय फ्रूटचा राजा म्हटलं जातं. कारण यात अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. नियमितपणे बदाम खाल्ल्याने शरीराला मोठी एनर्जी मिळते. तसेच हृदयाचं आरोग्यही चांगलं राहतं. अनेक लोक रात्री बदाम भिजवून ठेवून सकाळी खातात आणि यावेळी बदामाची साल काढून फेकतात. पण ही एक मोठी चूक असल्याचा दावा करण्यात आला आहे.

हेल्थ एक्सपर्ट ल्यूक कॉटिन्हो यांच्यानुसार, सगळ्यांनीच बदामाची साल काढू फेकू नये. साल काढल्याने बदामाची ताकद अर्धी होते. काही लोकांसाठी बदामाची साल फायदेशीर ठरते. पण सगळ्यांनी असं करू नये.

ल्यूकने लिहिलं की, बदाम भिजवून खावेत की साल काढून खावेत हे तुमच्या आरोग्यावर अवलंबून आहे. पण समस्या ही आहे की, जास्तीत जास्त लोकांना बदाम खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही.

बदामाच्या सालीचे फायदे 

बदामाच्या सालमध्ये हाय डायटरी फायबर, अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि फायटोकेमिकल असतात. एक्सपर्टनुसार, बदामात फ्लेवेनॉइड असतात जे हृदय निरोगी ठेवण्यासाठी महत्वाचे असतात. याने ऑक्सिडेटिव स्ट्रेस आणि इन्फ्लामेशन कमी करण्यास मदत मिळते.

भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे

बदामाच्या सालीमध्ये फायटिक अ‍ॅसिड असतं. जे आयर्न, झिंक, कॅल्शिअमसारखे मिनरल्समध्ये जुळून त्यांचे फायदे मिळू त्यांचे फायदे मिळू देत नाही. मात्र, बदाम रात्रभर भिजवून ठेवल्याने फायटिक अ‍ॅसिड निष्क्रिय होतं. त्यानंतर तुम्ही सालीसह बदाम खाऊ शकता.

बदामाची साल काढून टाकल्याने त्यातील फायबर कमी होतं. सोबतच अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट, फ्लेवोनॉइड आणि फेनोलिक अ‍ॅसिडही कमी होतं. बदामाची साल काढणं अशा लोकांसाठी फायदेशीर ठरतं ज्यांना लो फायबर डाएट घ्यायची आहे किंवा जे कॅल्शिअम, आयर्न, मॅग्नेशिअम इत्यादीसाठी केवळ प्लांट बेस्ड डाएटवर अवलंबून आहेत.

भिजवल्याने लवकर पचतात बदाम

एक्सपर्टनी सांगितलं की, जर तुम्हाला बदाम पचवण्यास समस्या होते किंवा तुमचं डायजेशन स्लो असेल तर बदाम भिजवून खावेत. असं केल्याने याचं टेक्स्चर मुलायम होतं आणि सहजपणे पचतात.

बदाम खाण्याची योग्य पद्धत

जर जास्त फायबर घेतल्याने समस्या, डायजेशन स्लो किंवा सालीने घशात समस्या होत असेल तर बदाम भिजवून साल काढून टाका. नाही तर बदाम भिजवून सालीसोबतच खाऊ शकता. कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी सालीसोबत खाऊ शकता.

Web Title: With or without peel expert told the best way to eat almond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.