बापरे! पोटात दुखतंय म्हणून हॉस्पिटलला पोहचली महिला; डॉक्टरांनी तपासताच ११ दिवसांनी हात-पाय कापले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 02:42 PM2021-09-09T14:42:56+5:302021-09-09T14:44:38+5:30
३९ वर्षाची मोनिकाच्या पोटात होणाऱ्या वेदना पाहता डॉक्टरांनी तिची तपासणी केली. काही चाचण्याही करायला सांगितल्या.
नवी दिल्ली – अनेकदा आपण आयुष्यातील काही समस्यांकडे छोटी समजून दुर्लक्ष करतो. आरोग्याच्या बाबतीत तर ते हमखास घडतं. ही समस्या खरंच खूप मोठी असते. हंगरी इथं राहणाऱ्या एका महिलेसोबत नेमकं हाच प्रकार घडला. मोनिका नावाच्या या महिलेच्या पोटाजवळील खालच्या बाजूस अचानक प्रचंड वेदना होऊ लागल्या. या वेदना न सहन झाल्याने तिने थेट हॉस्पिटल गाठलं. याठिकाणी डॉक्टरांनी तिला तपासलं असता जे काही समोर आलं त्यातून या महिलेचे संपूर्ण आयुष्यचं बदललं.
३९ वर्षाची मोनिकाच्या पोटात होणाऱ्या वेदना पाहता डॉक्टरांनी तिची तपासणी केली. काही चाचण्याही करायला सांगितल्या. या चाचणीचा रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनी मोनिकाला सांगितले की, तुम्हाला सेप्सिसची समस्या जडली आहे. जी तुमच्या शरीराच्या इतर भागातही पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचे हात-पायही गमवावे लागू शकतात अशी भीती डॉक्टरांनी तिला बोलून दाखवली. तेव्हा मोनिकाच्या पायाखालची जमीन सरकली.
दुर्मिळ आजारानं आयुष्यचं उद्ध्वस्त
मोनिकाने Pecs Aktual या वेबसाईटशी संवाद साधताना सांगितले की, त्यांच्या हात आणि पायांवर वैस्कुलर ऑक्लुजन(Vascular Occlusion) नावाचा दुर्मिळ आजार झाला आहे. त्यामुळे तिच्या नसांमध्ये रक्त जमा झाले आहे. रक्त शरीरातील इतर भागांपर्यंत पोहचण्यास अडचण येत आहे. सुरुवातीला डॉक्टरांनी सांगितले की, हे ऑपरेशननंतर बरं होऊ शकतं परंतु त्यानंतर मोनिकाला म्हणाले की, तिचे हाय-पाय कापल्याशिवाय पर्याय नाही. पहिल्यांचा त्यांना डावा पाय कापण्यात आला त्यानंतर ७ दिवसांनी उजवा पाय कापला आणि पुन्हा ३ दिवसांनी डावा हात कापण्यास भाग पडलं. शरीरातील नसा ठीक करण्यासाठी दुसरा मार्ग नव्हता. त्यामुळे मोनिकाचे एका पाठोपाठ १६ ऑपरेशन करावे लागले. आणि केवळ उजव्या हाताच्या साहय्याने मोनिका तिचं काम करू शकते.
पायावर लागलेल्या जखमेनंतर समस्या सुरू
मोनिकासोबत जे काही झाले त्याला अनुवांशिक कारणही जबाबदार आहे. त्याच्या कुटुंबात अल्सरचा त्रास आहे. स्वत: मोनिकाला २ वर्षापूर्वी पायाला जखम झाली होती. ती अल्सरमध्ये बदलली. जेव्हापासून मोनिका रुग्णालयात उपचारासाठी आलीय तेव्हापासून पती आणि आईच तिची देखभाल करतात. आठवडाभर तिला घराच्या बाहेरच पडणं कठीण झालं होतं. मोनिकाचं संपूर्ण आयुष्य ३६० डीग्रीनं बदललं. जेव्हा ती पोटात वेदना असल्याची तक्रार घेऊन हॉस्पिटलला पोहचली तेव्हा तिला पुन्हा घरी असं परतावं लागेल याची साधी कल्पनाही कुणी केली नव्हती.