Woman gives birth baby with antibodies: अरे व्वा! पहिल्यांदाच कोरोनाच्या एंटीबॉडी असलेल्या बाळाला महिलेनं दिला जन्म, डॉक्टर म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 03:33 PM2021-03-18T15:33:46+5:302021-03-18T15:45:07+5:30

Woman gives birth baby with antibodies : गर्भधारणेदरम्यान कोविड -१९ लसीचा पहिला डोस दिला गेला होता, ज्यामुळे जन्माला आलेलं बाळ हे कोविड १९ च्या एंटीबॉडीजसह जन्माला आलं आहे. 

Woman gives birth to first known baby with antibodies against coronavirus doctors say | Woman gives birth baby with antibodies: अरे व्वा! पहिल्यांदाच कोरोनाच्या एंटीबॉडी असलेल्या बाळाला महिलेनं दिला जन्म, डॉक्टर म्हणाले....

Woman gives birth baby with antibodies: अरे व्वा! पहिल्यांदाच कोरोनाच्या एंटीबॉडी असलेल्या बाळाला महिलेनं दिला जन्म, डॉक्टर म्हणाले....

googlenewsNext

कोरोनाच्या माहामारीने गेल्या एका वर्षभरापासून हाहाकार पसरवला आहे. अशा स्थितीत बाळाला जन्म देण्याबाबत प्रत्येक पालकांच्या मनात भीतीचं वातावरण होतं. कारण कोरोनाच्या संकटात लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना मृत्यूचा करावा लागला आहे. अशाचत एक सकारात्मक माहिती समोर आली आहे.  बालरोग तज्ञांनी एका महिलेची पहिली अशी घटना नोंदविली आहे, ज्यात तिच्या गर्भधारणेदरम्यान कोविड -१९ लसीचा पहिला डोस दिला गेला होता, ज्यामुळे जन्माला आलेलं बाळ हे कोविड १९ च्या एंटीबॉडीजसह जन्माला आलं आहे. 

प्रीप्रिंट सर्व्हर मेडआरक्झिव्हमधील अभ्यासानुसार, या बाळाच्या आईला मॉडर्ना एमआरएनए लसीचा एक डोस ३६ आठवड्यात आणि तिच्या गर्भधारणेच्या तीन दिवसात मिळाला. तीन आठवड्यांनंतर या महिलेनं एका निरोगी, पूर्ण दिवसांच्या मुलीला जन्म दिला, ज्याच्या रक्ताच्या नमुने जन्मानंतर ताबडतोब घेतल्यामुळे सार्स- कोव्ह-2 व्हायरसविरूद्ध अँटीबॉडीजची उपस्थिती असल्याचं दिसून आलं.

दिवसाला फक्त १ केळी खाल्यानं वजन कमी होण्यासह मिळतात हे फायदे; या प्रकारचं केळं सगळ्यात जास्त गुणकारी

एंटीबॉडीसह पहिल्यांदाच एका मुलीला जन्म दिल्याचे अमेरिकेच्या फ्लोरिडा अटलांटिक विद्यापीठातील पॉल गिलबर्ट आणि चाड रुडनिक या सह-लेखकांनी नमूद केले आहे. विशेषतः बाळाला स्तनपान करत असलेल्या महिलेला सामान्य २८ दिवसांच्या लसीकरण प्रोटोकॉलच्या टाइमलाइननुसार लसीचा दुसरा डोस मिळाल्याचे डॉक्टरांनी नमूद केले.

कोणत्याही त्रासासाठी गोळ्या घेताना करू नका ही चूक; डॉक्टरांनी सांगितली शरीरासाठी घातक ठरणारी सवय

पूर्वीच्या अभ्यासानुसार असे सिद्ध झाले आहे की कोविड-रिकव्हर्ड मातांकडून प्लेसेंटामार्फत त्यांच्या गर्भाकडे एंन्टीबॉडीज येणे अपेक्षेपेक्षा कमीवेळा होते, सध्याच्या संशोधनात असे दिसून आले आहे की मातेचे लसीकरण केल्यानंतर सार्स -कोव्ह -२ मधील संरक्षण आणि संसर्ग होण्याची शक्यता कमी आहे. तथापि, गिलबर आणि रुडनिक यांनी नमूद केले की लसीकरण केलेल्या मातांच्या जन्मलेल्या बाळांमध्ये एंटिबाॉडी प्रतिसादाचे प्रमाण निश्चित करण्यासाठी पुढील दीर्घकालीन अभ्यासाची आवश्यकता आहे.
 

Web Title: Woman gives birth to first known baby with antibodies against coronavirus doctors say

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.