हसू आल्यावर आपोआप बेशुद्ध पडते ही महिला, दोन दुर्मीळ आजारामुळे झाली हैराण!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 04:51 PM2021-04-27T16:51:13+5:302021-04-27T17:10:15+5:30
बेला नारकोलेप्सी आणि केटाप्लेक्सी नावाच्या दोन आजारांनी ग्रस्त आहे. बेलाने कधी विचार केला नव्हता की, या आजारांमुळे तिला हसणंही त्रासदायक ठरू शकतं.
जगात काही असेही आजार आहेत जे कधी आपण पाहिलेही नसतात ना त्यांच्याबाबत काही माहीत असतं. अशाच एका विचित्र आजाराबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या आजारामुळे एका महिलेला हसणंही महागात पडतं. ब्रिटनच्या बर्मिंगघममध्ये राहणारी बेला किलमार्टिन दोन गंभीर आजारांनी ग्रस्त आहे. ज्यामुळे तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. बेला नारकोलेप्सी आणि केटाप्लेक्सी नावाच्या दोन आजारांनी ग्रस्त आहे. बेलाने कधी विचार केला नव्हता की, या आजारांमुळे तिला हसणंही त्रासदायक ठरू शकतं.
नारकोलेप्सीमध्ये व्यक्तीला फार जास्त झोप येते तर केटाप्लेक्सी अशी समस्या आहे ज्यात स्ट्रॉंग इमोशननंतर शरीरावरील कंट्रोल सुटतो. बेलाच्या केसमध्ये ते इमोशन हसणं आहे. हेच कारण आहे की, जेव्हाही बेला हसते तेव्हा तिचा तिच्या शरीरावर कंट्रोल राहत नाही. ती अनेकदा हसता हसता झोपी जाते.
बेलाने सांगितले की, हसण्यामुळे तिचं पूर्ण शरीर शटडाउन मोडमध्ये जातं. ती म्हणाली की, एकदा स्वीमिंग पूलमध्ये कुणासोबत तरी बोलताना ती हसत होती आणि तिचा शरीरावरील कंट्रोल सुटला होता. ज्यानंतर ती बुडता बुडता वाचली होती. तेव्हापासून ती असुरक्षित ठिकाणांवर हसण्याबाबत सतर्क राहते.
ती म्हणाली की, माझ्यासोबत जास्त समस्या तेव्हा होते जेव्हा अचानक काही जोक करतात किंवा गंमतीदार बोलतात. आणि अशावेळी मला हसू आलं तर माझा माझ्या मसल्सवरील कंट्रोल सुटतो. माझे पाय कमजोर होतात, माझ्या मानेचा बॅलन्स जातो, माझ्या आजूबाजूला काय सुरू आहे हे मला समजत असतं पण आपल्या शरीरावर माझा कंट्रोल राहत नाही.
बेला म्हणाली की, जेव्हा केटाप्लेक्सी सुरू झाली तेव्हा मला वाटत होतं की, मला हार्टची समस्या आहे. जेव्हाही मी हसत होते तेव्हा मला चक्कर येत होती. त्यानंतर माझे डोळे फडफडत होते आणि माझे डोळे असे दिसत होते जसे मी नशा केली. पण आता हे वेगळ्या स्तरावर पोहोचलं आहे आणि माझा शरीरावरील कंट्रोल सुटतो. तिने पुढे सांगितले की, माझ्या घरातील लोकांना वाटत होतं की, मी ड्रग्स घेते. कारण मी जेव्हाही हसत होते तेव्हा माझे वेगळंच काहीतरी दाखवत होते. मी या समस्येमुळे अनेकदा जखमीही झाले आहे.