डाएट करूनही 'या' वयात वाढतं महिलांचं वजन, जाणून घ्या फीट राहण्याचे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 11:21 AM2020-04-20T11:21:59+5:302020-04-20T11:31:30+5:30

महिलांच्या आयुष्यात असा कालावधी येतो. जेव्हा नियमीत खाणं-पिणं, नियमीत झोपण्याच्या वेळा ठेवून सुद्धा आपलं वजन नियंत्रणात  ठेवू शकत नाही.

Women get more fat during menopause how to deal with menopause myb | डाएट करूनही 'या' वयात वाढतं महिलांचं वजन, जाणून घ्या फीट राहण्याचे उपाय

डाएट करूनही 'या' वयात वाढतं महिलांचं वजन, जाणून घ्या फीट राहण्याचे उपाय

Next

महिलांनी कितीही फिट राहायचा विचार केला तरी वयोमानानुसार  हार्मोन्समध्ये बदल होतात. हार्मोन्समुळे होणारे बदल वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात. पण वेळेवर लक्ष दिल्यास या समस्येपासून वाचता येऊ शकतं.  अनियमीत जीवनशैली, खाण्यापिण्यावर नियंत्रण नसणं, झोपेची कमतरता यांमुळे महिलांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत असतो.

महिलांच्या आयुष्यात असा कालावधी येतो. जेव्हा नियमीत खाणं-पिण, नियमीत झोपण्याच्या वेळा ठेवून सुद्धा आपलं वजन नियंत्रणात  ठेवू शकत नाही. कारण पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हार्मोन्सचे बदल लवकर होत असतात. मेनोपॉज सुद्धा अशीच स्थिती असते. जेव्हा महिलांचं शरीर एका वेगळ्या बदलांमधून जात असतं. महिलांच्या आयुष्यात मेनोपॉज हा असा कालावधी असतो. ज्यावेळी मासिक पाळी येणं पूर्णपणे बंद होतं. ४५ ते ५५ या वयोगटात हा बदल  होतो.

ही प्रकीया प्रत्येक महिलेल्या शरीरात वेगवेगळ्या टाईम ड्यूरेशननुसार होत असते. महिलांच्या शरीरातील मेनोपॉजची प्रक्रिया २ वर्षात पूर्ण होते. काही महिलांना १० वर्षांचा कालावधी सुद्धा लागू शकतो. मेनोपॉज सुरू झाल्यानंतर कधी पिरियड्स येतात तर कधी येत  नाहीत. काहीवेळा ब्लिडींग जास्त होतं. तर काहीवेळा खूप कमी होतं. या दरम्यान मूड स्विंग्स बदलणं, थकवा येणं, राग येणं, भूक न लागणे अशा समस्या उद्भवतात. 

मेनोपॉजच्या दरम्यान वजन वाढणं तुमच्या शरीरासाठी नुकसानकारक असू शकतं. त्यामुळे शरीरातील मध्यभाग म्हणजेच पोट, कंबर, मांड्याचा भाग वाढत जातो. त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यात रक्तवाहिन्याचे आजार, टाईप २ डायबिटीस आणि श्वासांसंबंधी आजारांचा समावेश असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरचा सुद्धा यात समावेश आहे.

मेनोपॉजच्यावेळी महिलांच्या पोटाची, मागच्या भागाची, मांड्याची चरबी वाढत जाते. हार्मोनल बदलांमुळे हा बदल होतो. वाढतं वय आणि महिलांची जीवनशैली यासाठी कारणीभूत ठरते. वाढत्या वयात शरीरातील फॅट मसल्समध्ये सुद्धा जातं. त्यामुळे मसल्सचा टाईटनेस कमी होतो.

उपाय

मेनोपॉजमध्ये वाढत्या वयाला नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्हाला जास्त काहीही करावं लागणार नाही. फक्त रोज व्यायाम करावा लागेल. योगा किंवा डान्स केला तरी चालू शकेल.

महिलांना वयात ३० ते ४० वर्षात जितक्या कॅलरीजची आवश्यकता असते.  त्यापेक्षा कमी कॅलरीज ५० वयात आवश्यक असतात. त्यासाठी जंक फूड, बाहेरचं खाणं, कोल्ड्रींग्स, गोड पदार्थ खाणं पूर्णपणे बंद करायला हवं.

या कालावधीत महिलांना खूप एकटेपणा आणि हेल्पलेस वाटत असतं. त्यामुळे ताण-तणाव येतो. ही समस्या टाळण्यासाठी नातेवाईकांना, कुटुंबियांना वेळ द्या. मित्र मैत्रिणींशी गप्पा मारून ताण-तणाव घालवण्याचा प्रयत्न करा.

Web Title: Women get more fat during menopause how to deal with menopause myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.