Women drink own urine : OMG! लसीवर भरवसा नाही; म्हणून कोरोनापासून बचावासाठी ती चक्क प्यायली स्वतःचं मुत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 02:38 PM2021-02-18T14:38:41+5:302021-02-18T14:42:45+5:30
Women drink own urine for prevent corona : इतकंच नाही तर तिच्या मुलांनाही तिनं असाच प्रकार करायला लावला.
कोरोनामुळे संपूर्ण जगभरात चिंताजनक वातवरण आहे. जानेवारी महिन्यात लसीकरणाला सुरूवात झाल्यानंतर सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला. थोड्याफार प्रमाणात लोक रिलॅक्स झालेले पाहायला मिळाले. पण आता पुन्हा भारतातसह जगभरातील इतर देशांमध्ये कोरोनाची प्रकरणं वाढत असल्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सुरूवातीपासूनच लोक कोरोनाच्या भीतीनं घरगुती उपाय करत आहेत. या उपयांचा अतिरेक वाटेल अशी बातमी सध्या समोर येत आहे.
लंडनमधील एका महिलेनं कोरोनापासून बचाव करण्य्साठी चार दिवस स्वतःची लघवी प्यायली आहे. इतकंच नाही तर तिच्या मुलांनाही तिनं असाच प्रकार करायला लावला. लंडनच्या हेल्थवॉच सेंट्रल हेल्थने (Healthwatch Central Health London) नुकत्याच प्रकाशित केलेल्या एका अहवालात हे कुटुंब व्हॉट्सअॅपवरील फेक मेसेजला बळी पडल्याचं सांगितलं आहे.
लंडनमध्ये राहणाऱ्या या महिलेला आपल्या जवळच्या मित्राकडून हा व्हॉट्सअॅप मेसेज फॉरवर्ड करण्यात आला होता. यामध्ये कोरोनातून बरे होण्यासाठी स्वत:ची लघवी प्या असं सांगण्यात आलं होतं. मेसेजमध्ये सांगितल्याप्रमाणे महिला स्वतःची लघवी प्यायली मुलांनाही तेच करायला सांगितलं. समोर आलेल्या माहितीनुसार या महिलेनं असं काही केलं यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये. हादरवणारी बातमी! दक्षिण आफ्रिकेच्या धोकादायक कोरोना स्ट्रेनचा भारतात शिरकाव; अधिक सर्तक राहावं लागणार
या महिलेनं WCHL ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, 'माझा कोरोनावर लशीवर अजिबात विश्वास नाही पण मला कोरोनावरील घरगुती उपायांववर विश्वास आहे.' म्हणूनच कदाचित उपायांची कोणतीही शाहानिशा न करता या महिलेनं हा भयंकर प्रकार केला. दरम्यान कोरोनाकाळात सुरूवातीपासूनच अनेक अफवा पसरवल्या होत्या. त्यामुळे शासनाकडून वारंवार योग्य मार्गदर्शनानुसार वर्तन करण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले जात होते. सायलेंट हार्ट अटॅकचं कारण ठरू शकतात ही लक्षणं; घाबरण्याआधीच जाणून घ्या महत्वाच्या टिप्स