...म्हणून महिलांना होतात मूड स्विंग्स; अशी घ्या काळजी!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 11:39 AM2018-10-05T11:39:25+5:302018-10-05T11:40:57+5:30
'तुझं ना घडीत एक आणि घडीत दुसरचं काहीतर सुरू असतं'.... असं अनेकदा आपण ऐकतो. खासकरून महिल्यांच्या बाबतीत हे जास्त ऐकायला मिळतं. कारण महिलांना अनेकदा मूड स्विंग्सची समस्या होत असून ही एक साधारण गोष्ट समजली जाते.
(Image Creadit:PsyCom.net)
'तुझं ना घडीत एक आणि घडीत दुसरचं काहीतर सुरू असतं'.... असं अनेकदा आपण ऐकतो. खासकरून महिल्यांच्या बाबतीत हे जास्त ऐकायला मिळतं. कारण महिलांना अनेकदा मूड स्विंग्सची समस्या होत असून ही एक साधारण गोष्ट समजली जाते.
मूड स्विंग्स होण्याला मूड डिसऑर्डर असेही म्हटलं जातं. पहायला गेलं तर ही लक्षण साधारण समजली जातात. परंतु या लक्षणांनी जर गंभीर रूप धारण केलं तर मात्र पीडित व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता असते. महिलांना ही समस्या त्यांच्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल चेंजेसमुळे होते.
जर तुम्हाला मूड स्विंग्सची समस्या फार पूर्वीपासून होत असेल तर, तुम्हाला एखाद्या मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. कारण ही समस्या अधिक काळ राहिल्यास त्या व्यक्तीला शारीरिकरित्या, त्याचप्रमाणे मानसिक आणि भावनात्मकरित्या कमजोर बनवते. याचा परिणाम त्या व्यक्तीच्या कौटुंबिक तसेच सामाजिक जीवनावर होतो.
तुम्हाला या समस्येचा सामना करावा लागू नये, त्यासाठी जाणून घेऊयात मूड स्विंग्स होण्याची कारणं आणि लक्षणं...
मूड स्विंग्ज होण्याची लक्षणं -
1.भावनात्मक लक्षणं
मूड स्विंग्जने पीडित असलेल्या व्यक्तिंमध्ये अनेकदा भावनात्मक लक्षणं दिसून येतात. अशा व्यक्ती अनेकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. भूतकाळातील काही आठवणींमध्ये रमणं, सतत चिंता करणं, निराश होणं किंवा एकटं वाटणं, चिडचिड करणं यांसारखी लक्षणं दिसून येतात.
2. शारीरिक लक्षणं
भावनात्मक लक्षणांप्रमाणेच मूड स्विंग्ससाठी शारीरिक लक्षणंही जबाबदार ठरतात. परंतु अनेकदा ही लक्षणं समजणं फार कठिण जातं. सतत थकवा, आळस, डोकेदुखी, अंगदुखी, पचनाच्या समस्या, त्याचबरोबर निर्णय घेण्याची क्षमता कमी होणं, झोप न येणं यांसारख्या समस्या होणं.
मूड स्विंग्सची कारणं -
1. आसपासचे वातावरण
2. मनावर एखाद्या गोष्टीचा आघात होणं
3. अनुवांशिक कारण
मूड स्विंग्सचे उपचार -
1. चांगल्या आणि आनंदी वातावरणात राहण्याचा प्रयत्न करा.
2. स्वतःला कोणत्या ना कोणत्या कामामध्ये व्यस्त ठेवा.
3. मूड स्विंग्सचा त्रास वाढल्यास काउंन्सिलरचा सल्ला घ्यावा.
4. आपल्या मनतल्या गोष्टी एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत शेअर करव्यात.
5. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं घेणं.
6. मेडिटेशन आणि प्राणायम या गोष्टींचा आपल्या दैनंदिन जीवनात समावेश करावा.
7. गाणी ऐका.