काळजी वाढली! कोरोनामुक्त झालेल्यांना 'गुलियन बॅरी सिंड्रोम' या आजाराचा धोका, जाणून घ्या लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2020 06:20 PM2020-11-18T18:20:14+5:302020-11-18T18:26:44+5:30

CoronaVirus News & Latest Updates : कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये सध्या गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) हा श्वसनाशी संबंधित दुर्मिळ आजार आढळून येत आहे. 

Women with rare guillain barre syndrome post covid treated at mumbais global hospital | काळजी वाढली! कोरोनामुक्त झालेल्यांना 'गुलियन बॅरी सिंड्रोम' या आजाराचा धोका, जाणून घ्या लक्षणं

काळजी वाढली! कोरोनामुक्त झालेल्यांना 'गुलियन बॅरी सिंड्रोम' या आजाराचा धोका, जाणून घ्या लक्षणं

googlenewsNext

कोरोना व्हायरसने गेल्या अनेक महिन्यापासून संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या संक्रमणातून बरं झाल्यानंतरही रुग्णांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना  पोस्ट  कोविड समस्या उद्भवतात. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार कोरोना व्हायरसच्या संपर्कात आल्यानंतर दोन ते तीन महिन्यांपर्यंत रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होणं, थकवा, एन्जायटी, डिप्रेशनच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. दरम्यान कोरोना रुग्णांबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये सध्या गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) हा श्वसनाशी संबंधित दुर्मिळ आजार आढळून येत आहे. 

मुंबईतील एका ४९ वर्षीय कोरोनाग्रस्त महिलेला गुलियन बॅरी सिंड्रोम हा आजार असल्याचे दिसून आले होते. कोरोनामुक्त रुग्णाला हा आजार होणं हे दुर्मिळ आहे. परळ येथील ग्लोबल रुग्णालयातील डीबीएस प्रोग्रामचे सीनियर कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट डॉ. पंकज अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली अन्य डॉक्टरांच्या टीमने या महिलेवर यशस्वी उपचार केले आहेत. या महिलेच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर २६ ऑक्टोबर रोजी डिस्चार्ज देण्यात आला होता. 

माधवी धारिया ही महिला रायगड जिल्ह्यातील महाड शहरात राहणारी आहे. यांना कोरोनाची लागण झाली होती. या आजाराची सौम्य लक्षणं असल्याने याच्यांवर पतीने घरीच उपचार केले. ३ आठवड्यानंतर त्यांना पाठदुखीचा त्रास सुरु झाला. ऑर्थोपेडिक सर्जनद्वारे औषधोपचार सुरु होते. पण काही दिवसांनी चेहऱ्यांच्या एका बाजूला पक्षाघात झाला होता. या महिलेला चालता येत नव्हतं. प्रकृती बिघडत असल्याचे लक्षात घेता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कुटुंबियांनी तिला मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात दाखल केलं.

न्यूरोलॉजिस्ट डॉ. पंकज अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार ,''या महिलेला चालता येत नसल्याने व्हीलचेअरवर रुग्णालयात आणले होते.  थकवा आणि अशक्तपणा जाणवत होता. हातांनी काहीही पकडता येत नव्हतं, बोलताना शब्दही स्पष्ट उच्चारता येत नव्हते. अशा स्थितीत या महिलेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. या चाचणी अहवालात महिलेला गुलियन बॅरी सिंड्रोम हा विकार असल्याचं  दिसून आलं.''

 दिलासादायक! 'या' देशात फायजरच्या कोरोना लसीचे वितरण होणार; ४ राज्यात सुरूवात

काय आहे  गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस)?

गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) हा एक दुर्मिळ विकार आहे. मुळात, रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्यास संसर्गजन्य आजाराची पटकन लागण होते. मेंदू, हृदय, मूत्रपिंड आणि फुफ्फुस यांच्यासारख्या अवयवांवर परिणाम होतो. मज्जातंतू हळूहळू निकामी करुन या आजाराचा  व्हायरस बोटं, पाय, हात आणि फुफ्फुसं आणि श्वसननलिकेवरही हल्ला चढवतो. अशावेळी रुग्णांची अवस्था पक्षाघात म्हणजे लकवा आल्यासारखी होते. GBS हा आजार श्वसन किंवा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल कोणत्याही व्हायरल इन्फेक्शनमुळे होऊ शकते, डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार वेळेवर निदान आणि उपचार झाल्यास रुग्ण यातून बरा होऊ शकतो. यावर रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी इंजेक्शनचा कोर्स पाच दिवस दिला जातो. या उपचारानंतर 10 दिवसांनी रुग्ण घरी जाऊ शकतो.

गूडन्यूज! आता घरच्या घरी करता येईल कोरोना टेस्ट; पहिल्या सेल्फ टेस्ट किटला अमेरिकन FDAची मंजुरी

मुंबईतील ग्लोबल रूग्णालयातील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विवेक तलौलीकर म्हणाले की, " कोरोना व्हायरस हा फुफ्फुसावर परिणाम करतो. परंतु, या विषाणूमुळे मानवी शरीरातील अवयवांसह मेंदूवर घातक ठरतो. या आजाराचे वेळीच निदान आणि उपचार होणं गरजेचं आहे.  म्हणून कोरोना संक्रमणानंतर कोणताही त्रास होत असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.'' 

Web Title: Women with rare guillain barre syndrome post covid treated at mumbais global hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.