नाइट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिलांमध्ये लवकर येते रजोनिवृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 11:12 AM2019-03-08T11:12:48+5:302019-03-08T11:13:10+5:30

ह्यूमन रिप्रॉडक्शन जर्नलमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, नाइट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिलांना सामान्य वेळेआधी आणि वयाआधी मेनॉपॉज(रजोनिवृत्ती - स्त्रीच्या मासिक पाळी कायमची बंद होण्याला रजोनिवृत्ती म्हणतात.) येऊ शकतात.

Women working in night shift suffer from early menopause says report | नाइट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिलांमध्ये लवकर येते रजोनिवृत्ती

नाइट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिलांमध्ये लवकर येते रजोनिवृत्ती

Next

(Image Credit : IFLScience)

ह्यूमन रिप्रॉडक्शन जर्नलमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, नाइट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिलांना सामान्य वेळेआधी आणि वयाआधी मेनॉपॉज(रजोनिवृत्ती - स्त्रीच्या मासिक पाळी कायमची बंद होण्याला रजोनिवृत्ती म्हणतात.) येऊ शकतात. तेच डेली मेलमध्ये प्रकाशित एका रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, ज्या महिला २० महिने नाइट शिफ्टमध्ये काम करत होत्या, त्यांच्यात मेनोपॉजचा धोका ९ टक्क्यांपर्यंत वाढतो.

तर ज्या महिला २० वर्षांपेक्षा अधिक काळ नाइट शिफ्ट करतात त्यांना लवकर मेनोपॉजचा धोका ७३ टक्क्यांनी वाढतो. हा शोध ८० हजारपेक्षा अधिक नर्सवर करण्यात आला. या रिसर्चमध्ये त्या महिलांचा समावेश करण्यात आला होता, ज्या गेल्या २२ वर्षांपासून शिफ्टमध्ये काम करत होत्या. या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, स्ट्रेसमुळे महिलांना लवकर मेनोपॉज येतात. चला जाणून घेऊ याचे दुष्परिणाम...

हाडं आणि स्मरणशक्तीचं नुकसान

नाइट शिफ्टमध्ये काम करणे हे महिला असो वा पुरूष दोघांसाठीही नुकसानकारक असतं. मेमरी लॉसपासून ते हाडांच्या वेगवेगळ्या समस्यांचा या लोकांना सामना करावा लागतो. पण यासोबतच नाइट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिलांमध्ये लवकर मेनॉपॉजचा धोकाही वाढतो. 

रात्री स्ट्रेस हार्मोन्स राहतात अॅक्टिव्ह

ह्यूमन रिप्रॉडक्शन जर्नलमध्ये प्रकाशित एका शोधानुसार, दिवसाऐवजी रात्री तणावाचे हार्मोन्स जास्त अॅक्टिव्ह राहतात, ज्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींचा तणाव वाढू शकतो. तणावामुळे सेक्स हार्मोन्स ऐस्ट्रोजन तयार होण्यासही अडचण येते. जी मेनॉपॉजसाठी कारणीभूत ठरू शकते. रिसर्चमध्ये हे सुद्धा आढळलं आहे की, रात्री काम करणाऱ्या महिलांमध्ये ऑव्यूलेशन कमी होतं. जर तुम्ही दिवसाच्या शिफ्टमध्ये काम करत आहात, तर तुमची मेनॉपॉजची स्थिती ४ ते ५ वर्षांपर्यंत वाढते. 

पुरूषांच्या तुलनेत महिलांना जास्त नुकसान

एनबीटीला एका डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या महिला शिफ्टमध्ये नाइट शिफ्टला जास्त काम करतात, त्यांना ऑस्टियोपोरोसिस आणि स्मरणशक्तीची समस्या होऊ लागते. झोप आपल्या बायोलॉजिकल सायकलचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. याची अनियमितता झाल्यास अनेकप्रकारच्या समस्या होऊ शकतात. अनियमित झोप आणि अपुऱ्या झोपेची अनेक कारणे असू शकतात. नाइट शिफ्ट त्यातीलच एक आहे. रिसर्चमध्ये हे सुद्धा समोर आलं की, पुरूषांच्या तुलनेत महिलांसाठी नाइट शिफ्ट नुकसानकारक आहे. 

Web Title: Women working in night shift suffer from early menopause says report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.