Women's day special : तुम्ही 'सुपर वुमन सिंड्रोम'च्या शिकार तर नाही?; जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 05:03 PM2019-03-07T17:03:05+5:302019-03-07T17:04:09+5:30

सध्या महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरूषांच्या बरोबरीने काम करत आहेत. आपल्यापैकी बऱ्याचजणी स्वतःला प्रत्येक कसोटीवर खऱ्या करण्यासाठी झटत असतात. त्यासाठी अगदी अहोरात्र मेहनत घेण्याचीही त्यांची तयारी असते.

Women's day special 2019 you are victim of super woman syndrome know what is super woman syndrome its causes in Marathi | Women's day special : तुम्ही 'सुपर वुमन सिंड्रोम'च्या शिकार तर नाही?; जाणून घ्या!

Women's day special : तुम्ही 'सुपर वुमन सिंड्रोम'च्या शिकार तर नाही?; जाणून घ्या!

googlenewsNext

(Image Credit : dailypost.in)

जागतिक महिला दिन.... स्त्रीशक्तीचा आदर करण्याचा दिवस, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सध्या महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरूषांच्या बरोबरीने काम करत आहेत. आपल्यापैकी बऱ्याचजणी स्वतःला प्रत्येक कसोटीवर खऱ्या करण्यासाठी झटत असतात. त्यासाठी अगदी अहोरात्र मेहनत घेण्याचीही त्यांची तयारी असते. रात्रंदिवस काम करून त्या अथक परिश्रम करत असतात. यामध्ये त्यांना अगदी स्वतःचाही विसर पडतो. आपल्या आरोग्याची अजिबात लक्षं न देता त्या प्रत्येक गोष्टींमध्ये अव्वल येण्याचा प्रयत्न करत असतात. काही महिलांच्या मनी ध्यानी फक्त सर्व गोष्टींमध्ये परफेक्ट असणं ही एकच गोष्ट असते. पण तुम्हाला माहीत आहे का? हा एक मानसिक आजार आहे. द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, ज्यामध्ये महिला स्वतःला प्रत्येक ठिकाणी जेव्हा परफेक्ट सिद्ध करू शकत नाही, त्यावेळी त्यांच्यावर मानसिक दबाव येतो. हा एक मानसिक आजार असून त्याला 'सुपर वुमन सिंड्रोम' असं नाव देण्यात आलं आहे. अशा प्रकरणांमध्ये जर एखादी महिला स्वतःला सर्व गोष्टींमध्ये परफेक्ट सिद्ध करू शकत नसेल तर तिच्यामध्ये एक प्रकारचा गिल्ट तयार होतो. या आजाराकडे दुर्लक्षं करणं नुकसानदायी ठरू शकतं. 

काय आहे सुपर वुमन सिंड्रोम?

सुपर वुमन सिंड्रोम एक असा सिंड्रोम आहे, ज्यांमध्ये महिला घर परिवाराच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यामध्ये अशाप्रकारे व्यस्त होतात की, त्यांच्याकडे स्वतःला देण्यासाठी ऊर्जा किंवा वेळ नसतो. एवढचं नाही तर महिला कोणत्याच क्षेत्रात स्वतःला सिद्ध करू शकल्या नाहीत तर त्या स्वतःला दोष देऊ लागतात. एवढचं नाही तर, ही स्थिती कधी-कधी एवढी घातक ठरते की, महिला डिप्रेशनमध्ये जातात. 

सेरोटोनिन असू शकतं कारण

सुपर वुमन सिंड्रोमसाठी सेरोटोनिनची कमतरता हेदेखील मुख्य कारण असू शकतं. दरम्यान, हे एक अत्यंत महत्त्वाचं केमिकल आहे. जे व्यक्तीचा स्ट्रेस दूर करून मूड फ्रेश करण्यासाठी मदत करते. मेंदूमध्ये सेरोटोनिनचा स्तर वाढविण्यासाठी औषधांचा आधार घेण्यात येतो. याव्यतिरिक्त मसाज थेरपी आणि उन्हामध्ये बसल्याने सेरोटोनिन हार्मोन्समध्ये वाढ होते. 

या आजारांपासून बचाव करण्यासाठी :

- सुपर वुमन सिंड्रोमपासून बचाव करण्यासाठी आत्मपरिक्षण करणं आवश्यक आहे. जसं घर किंवा ऑफिससाठी वेळा काढला जातो. तसचं स्वतःला नियमितपणे वेळ देणं सुरू करणं आवश्यक आहे. स्वतःला खुश ठेवण्यासाठी प्रयत्न करा. 

- धावपळीच्या जीवनशैलीमध्ये थोडा बदल करून प्राथमिक महत्त्व कोणत्या गोष्टींना द्यायचं हे निश्चित करून घ्या. एकाच वेळी जास्त काम करणं टाळा. घरी ऑफिसचं काम करू नका. जर तुमचं लहान मुल असेल तर कोणत्याही गोष्टीपेक्षा त्यांना प्राधान्य द्या. 

- एक हेल्दी दिनक्रम हेल्दी आणि डिप्रेशनमुक्त जीवनच्या दिशेन पहिलं पाऊल असू शकतं. त्यासाठी आपल्या दिनक्रमामध्ये काही बदल करणं आवश्यक असू शकतं. डेली लाइफमध्ये व्यायामाला महत्त्व द्या. यामुळे मेंदूमध्ये हॅपी हार्मोन्स रिलिज होण्यास मदत होते. तसेच आहारामध्ये हेल्दी पदार्थांचा समावेश करा आणि पुरेशी झोप घ्या. यामुळे तुम्ही सुपर वुमन सिंड्रोमपासून सुटका करू शकता. 

Web Title: Women's day special 2019 you are victim of super woman syndrome know what is super woman syndrome its causes in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.