​दारू पिण्यात झपाट्याने वाढतोय महिलांचा टक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2016 02:13 PM2016-10-25T14:13:50+5:302016-10-25T14:15:08+5:30

एका जागतिक अभ्यासानुसार नवपीढीतील तरुण महिलांमध्ये दारूचे व्यसन झपाट्याने वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत.

Women's population growing fast in drinking alcohol | ​दारू पिण्यात झपाट्याने वाढतोय महिलांचा टक्का

​दारू पिण्यात झपाट्याने वाढतोय महिलांचा टक्का

Next
रूचे व्यसन प्रामुख्याने पुरुषांमध्ये जास्त असते हा समज आगामी काळात खोटा ठरू शकतो अशी परिस्थिती आहे. सर्व क्षेत्रांप्रमाण दारू पिण्यातही महिला आता पुरुषांच्या खांद्याला खांदा देताना दिसत आहेत. एका जागतिक अभ्यासानुसार नवपीढीतील तरुण महिलांमध्ये दारूचे व्यसन झपाट्याने वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत.

१८९१ - २००१ यादरम्यान जन्मलेल्या सुमारे ४० लाख लोकांच्या विश्लेषणाअंती पुरुषांमध्ये दारूचे व्यसन महिलांच्या तुलनेत खूप जास्त प्रमाणात होते. परंतु ‘बीएमजी ओपन’च्या रिपोर्टनुसार सध्याच्या पीढीमध्ये हा फरक झपाट्याने कमी होतोय.

वीसाव्या शतकात पुरुषांची महिलांशी तुलना केली असता पुरुषांमध्ये -

► दारूचे व्यसन २.२ पट अधिक  
► धोक्याच्या पातळीपर्यंत दारू पिण्याचे प्रमाण ३ पट जास्त
► दारूमुळे आरोग्यविषयक समस्या उद्भवण्याची शक्यता ३.६ पट अधिक होती.

हेच प्रमाण आता मात्र या दशकात झपाट्याने खाली येत आहे. म्हणजे गेल्या शतकाच्या शेवटी शेवटी जन्मलेल्या पुरुषांची महिलांशी तुलना केली असता पुरुषांमध्ये -

► दारूचे व्यसन फक्त १.१ पट अधिक,
► धोक्याच्या पातळीपर्यंत दारू पिण्याचे प्रमाण १.२ पट जास्त,
► दारूमुळे आरोग्यविषयक समस्या उद्भवण्याची शक्यता नाममात्र १.३ पट अधिक राहिली आहे.

Female Drinikg

आॅस्ट्रेलियातील न्यु साऊथ वेल्स विद्यापीठातील संशोधकांनी जगभरातून जमा केलेल्या माहितीचे विश्लेषण करून निष्कर्ष काढला की, महिलांमध्ये दारूचे व्यसन व त्यासंबंधीत आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. केवळ पुरुषांपुरती ही समस्या आता मर्यादित राहिलेली नाही. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी आणि खासकरून तरुण महिलांमध्ये दारूच्या दुष्परिणामांविषयी जागृती करणे गरजेचे आहे.

‘लंडन स्कुल आॅफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन’चे प्रा. मार्क पॅटिक्रू सांगतात की, बदलत्या काळानुसार पुरुष व महिलांचे समाजातील बदलते स्वरुप व स्थान काही अंशी यासाठी कारणीभूत आहे. तसेच दारूची असलेली सहज उपलब्धता हेसुद्धा महिलांमध्ये व्यसन वाढण्याचे कारण असू शकते.

Web Title: Women's population growing fast in drinking alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.