कम्प्युटरवर सतत काम करता? तुमच्या मनगटाला होऊ शकते ही समस्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 11:14 AM2019-02-19T11:14:56+5:302019-02-19T11:15:07+5:30
दररोज वेगवेगळ्या कामांमध्ये बिझी असल्याने तुम्ही मनगटाच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करत असाल. पण ही पुढे जाऊन ही एक मोठी समस्या होऊ शकते.
दररोज वेगवेगळ्या कामांमध्ये बिझी असल्याने तुम्ही मनगटाच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करत असाल. पण ही पुढे जाऊन ही एक मोठी समस्या होऊ शकते. पण तुम्हाला हे विसरून अजिबात चालणार नाही की, मनगटाच्या माध्यमातून तुम्हाला सर्वच कामे करावी लागतात.
कम्प्युटर ठरू शकतं कारण
तासंतास कम्प्युटरवर लिहित राहिल्याने फार जास्त वजन असलेल्या वस्तू उचलल्यावर अचानक जोरात वेदना होऊ लागतात. अनेकजण या दुखण्याकडे दुर्लक्ष करतात. पण याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. इतकेच काय तर तुम्हाच्यावर सर्जरी करण्याची वेळ देखील येऊ शकते. मनगटात वेदना होण्याची समस्या ही पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक बघायला मिळते. खासकरून थंडीच्या दिवसात ही समस्या अधिक वाढते.
कार्पल टनल सिंड्रोम
सतत कम्प्युटरवर माउस आणि की-बोर्डचा वापर केल्याने मनगट आणि बोटांवर जोर पडू लागतो. अनेकदा सूजही येते, ज्यामुळे मनगट सुन्न होतं आणि झिणझिण्याही येऊ लागतात. अनेकदा याचा प्रभाव हात आणि बोटांवर पडू लागतो. याला कार्पल टनल सिंड्रोम म्हटले जाते. कार्पल टनल मनगटाजवळ एक नलिका आहे. याच्याशी निगडीत तंत्रिका बोटांशी जुळलेल्या असतात. अशात जेव्हाही मनगटा जवळीत कोशिका आणि नसांवर दबाव पडतो, तेव्हा त्याचा प्रभाव बोटांवर आणि हातांवरही पडतो.
काय करावे उपाय?
सकाळी आणि सायंकाळी एखाद्या तेलाने हाताची आणि मनगटाची मालिश करा.
काही वेळासाठी होईना मनगटाला थोडा आराम द्यावा.
वेदना होत असताना मनगटावर जास्त जोर पडू देऊ नका. जड वस्तूही यावेळी उचलू नका. काम करत असताना काही वेळासाठी ब्रेक घेऊन हातांना आराम द्या. तसेच तुम्ही स्माइल बॉलने काहीवेळ व्यायाम करू शकता.
जेव्हाही मनगटात वेदना होतात तेव्हा वेदना होत असलेल्या जागेवर बर्फाने शेका. असे केल्याने तुम्हाला आराम मिळेल.
हेही करावे
मनगटाची योग्य मुद्रा - मनगटाला योग्य मुद्रेत ठेवणे फार महत्त्वाचे आहे. कम्प्युटरवर काम करताना मनगट निट न ठेवणे, लागोपाठ अनेक तास काम करणे, बोटांना आराम न देणे, सतत जड मोबाईल हातात धरून ठेवणे ही मनगट दुखण्याची कारणे ठरू शकतात. यावर उपाय म्हणून तुम्ही मनगटाला सपोर्ट करणाऱ्या माउस पॅडचा वापर करा.