वर्क फ्रॉम होममुळे वजन वाढतेय? सुस्ती आलीय? 'असा' व्यायाम जो तुम्हाला ठेवेल फीट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 07:05 PM2021-05-23T19:05:04+5:302021-05-23T19:07:22+5:30

सतत एकाच जागेवर बसून काम केल्यामुळे अनेकांना अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामध्ये विशेष करून पाठीच्या अनेक समस्या उद्धभवत आहेत. आज आम्ही तुम्हाला असेच काही व्यायाम सांगणार आहोत. ते केल्याने तुम्ही निरोगी तर राहालच त्याचवेळी तुमचे वजन देखील वाढणार नाही.

Work from home to gain weight? Are you lazy An exercise that will keep you fit. | वर्क फ्रॉम होममुळे वजन वाढतेय? सुस्ती आलीय? 'असा' व्यायाम जो तुम्हाला ठेवेल फीट

वर्क फ्रॉम होममुळे वजन वाढतेय? सुस्ती आलीय? 'असा' व्यायाम जो तुम्हाला ठेवेल फीट

googlenewsNext

कोरोना काळात लॉकडाऊन मुळे कंपन्यांमध्ये वर्क फ्रॉम होम पद्धतीने काम सुरू आहे.  मात्र याचे दुष्परिणामही आहेत. घरातून काम करताना बराच वेळ एकाच जागी बसून काम करावे लागते. तसेच घरातूनच काम सुरू असल्याने आठ तासांची शिफ्ट कधी-कधी दहा तास होते. सतत एकाच जागेवर बसून काम केल्यामुळे अनेकांना अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामध्ये विशेष करून पाठीच्या अनेक समस्या उद्धभवत आहेत. वर्क फ्रॉम होममुळं घरातून काम करणाऱ्यांच्या कामाचे तास वाढल्याने नवीन कौशल्य शिकण्याच्या क्षमतेवरही परिणाम झाला आहे. 

घरात राहून नेमका कोणता व्यायाम करावा हा प्रश्न तुम्हाला पडत असेल. आज आम्ही तुम्हाला असेच काही व्यायाम सांगणार आहोत. ते केल्याने तुम्ही निरोगी तर राहालच त्याचवेळी तुमचे वजन देखील वाढणार नाही. महत्वाचे म्हणजे सतत बसल्यामुळे तुमच्या पाठीवर जो ताण येत आहे तो ही व्यायामांमुळे दूर होईल.

बहुतेकांना असे वाटते की, दोरीवरच्या उड्या फक्त लहान मुलांनीच माराव्यात. खरंतरं प्रत्येक वयोगटातील व्यक्तींनी दोरीवरच्या उड्या मारल्या पाहिजेत.

  • दोरीवरच्या उड्या मारणे हा अत्यंत सोपा व्यायाम आहे. यामुळे हृदयाचे ठोक्यांमध्ये सुधार येतो. तसेच हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोकाही कमी होतो.
  • आपल्यापैकी अनेकजण वजन कमी करण्यासाठी विविध प्रयत्न करतात. मात्र, वजन काही कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी दोरीवरच्या उड्या खूप फायदेशीर आहेत. आपले वजन कमी होते.
  • दोरीवरच्या उड्या मारताना किमान तीन ते चार तास तुम्ही काही खाऊ नका अन्यथा तुमच्या पोटात दुखू शकते.

Web Title: Work from home to gain weight? Are you lazy An exercise that will keep you fit.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.