World Asthma Day: फुप्फुसांमध्ये जमा विषारी पदार्थ आणि कफ बाहेर काढतात हे 5 उपाय, श्वास घेण्याचीही वाढेल क्षमता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 09:59 AM2023-05-02T09:59:19+5:302023-05-02T09:59:32+5:30

World Asthma Day : डॉक्टर आणि एक्सपर्ट अस्थमाच्या रूग्णांना फुप्फुसांची काळजी घेण्याचा सल्ला देतात. जेणेकरून त्याचं काम चांगलं रहावं आणि श्वास घेण्याची क्षमता वाढावी.

World Asthma Day : Dietician told 5 lungs cleaning food that can detox your lungs naturally | World Asthma Day: फुप्फुसांमध्ये जमा विषारी पदार्थ आणि कफ बाहेर काढतात हे 5 उपाय, श्वास घेण्याचीही वाढेल क्षमता

World Asthma Day: फुप्फुसांमध्ये जमा विषारी पदार्थ आणि कफ बाहेर काढतात हे 5 उपाय, श्वास घेण्याचीही वाढेल क्षमता

googlenewsNext

How To Remove Mucus From Lungs Naturally : दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी वर्ल्ड अस्थमा डे (World Asthma Day) असतो. या दिवसाचा उद्देश या आजाराबाबत जागरूकता करणे हा आहे. अस्थमावर कोणताही ठोस असा उपचार नाही आणि हा आजार वयोवृद्धांसोबतच कोणत्याही वयातील लोकांना होऊ शकतो. यात फुप्फुसाचे छोटे वायुमार्ग आकुंचन पावतात आणि त्यांवर सूज येते. याने रूग्णाला खोकला, घाबरलेपणा, श्वास घेण्याची समस्या आणि छातीत आखडलेपणा अशी लक्षण दिसतात.

डॉक्टर आणि एक्सपर्ट अस्थमाच्या रूग्णांना फुप्फुसांची काळजी घेण्याचा सल्ला देतात. जेणेकरून त्याचं काम चांगलं रहावं आणि श्वास घेण्याची क्षमता वाढावी. वाढतं  प्रदूषण आणि अस्थमासारख्या आजारामुळे फुप्फुसाचं गंभीर नुकसान होतं. फुप्फुसं साफ आणि मजबूत ठेवण्यासाठी अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट  आणि अ‍ॅंटी-इंफ्लेमेटरी गुण असलेल्या पदार्थांचं सेवन करण्याचा  सल्ला दिला जातो.

डाइटीशिअन शिखा अग्रवाल शर्मा यांनी काही पदार्थांबाबत सांगितलं आहे, जे फुप्फुसात साचलेले विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. तसेच श्वास घेण्याची क्षमताही वाढवतात.

आल्याच्या मदतीने साफ करा फुप्फुसं

खोकला आणि सर्दी ठीक करण्यासाठी सगळ्यात जास्त वापरला जाणारा घरगुती उपाय म्हणजे आलं. आल्यामध्ये अ‍ॅंटी-इंफ्लेमेटरी गुण असतात. याने श्वसन नलिकेतील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत मिळते. आल्यामध्ये मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, बीटा-कॅरोटीन आणि झिंकसारखे व्हिटॅमिन व खनिज भरपूर आहेत. हे सुद्धा फुप्फुसं निरोगी ठेवण्यास मदत करतात. चहा, सॅलड, भाजी आणि काढ्यामध्ये याचा वापर करू शकता.

फुप्फुसांना मजबूत करते हळद

श्वासाच्या आजारामुळे येणारी सूज आणि फुप्फुसात जमा झालेला कफ कमी करण्यासाठी हळद मदत करते. हळदीमधील तत्व फुप्फुसाला नॅच्युरली साफ करतात. तसेच शरीरात जमा झालेली विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठीही हळद बेस्ट उपाय मानला जातो. दूध, भाजी, स्मूदी आणि सलादच्या माध्यमातून तुम्ही हळदीचं सेवन करू शकता.

फुप्फुसांना निरोगी ठेवतं मध

मध हे नॅच्युरल स्वीटनर आहे आणि आपल्या अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल गुणांमुळे श्वसनासंबंधी समस्या कमी करण्यासाठी मदत करतं. याने वायुमार्ग साफ करण्यास आणि फुप्फुसं निरोगी ठेवण्यास मदत मिळते. कोमट पाण्यात एक चमचा मध टाकून प्यायल्यास तुम्हाला मोठा फायदा मिळू शकतो.

लसूण आहे फुप्फुसांना मजबूत ठेवण्याचा बेस्ट उपाय

लसणामध्ये एलिसिन नावाचं एक शक्तीशाली तत्व असतं. जे एका अ‍ॅंटी-बायोटिक एजंटच्या रूपात काम करतं. याने श्वसन संक्रमण ठीक करण्यास मदत मिळते. याने कंजेशन आणि श्वासाची समस्या दूर करण्यासही मदत मिळते. तसेच याने सूज आणि फुप्फुसाच्या कॅन्सरचा धोका कमी करण्यासही मदत मिळते. अस्थमाच्या रूग्णांसाठी लसूण रामबाण उपाय मानला जातो.

फुप्फुसं मजबूत ठेवते ग्रीन टी

वजन कमी करण्यापासून ते सूज कमी करण्यापर्यंत  ग्रीन टी चे अनेक आरोग्यदायी लाभ मिळतात. दिवसातून दोन वेळा  ग्रीन टी चं सेवन केलं फुप्फुसाची कोणतीही स्थिती सुधारण्यास फार मदत मिळते.
 

Web Title: World Asthma Day : Dietician told 5 lungs cleaning food that can detox your lungs naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.